भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे राष्ट्रीय डॉक्टर डे कार्यक्रम उत्साहात साजरा
धुळे जिल्हा
१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे संपूर्ण भारतात साजरा केला जातो डॉक्टरांच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने लोक सेवा मंडळाच्या ‘रुग्ण मित्रांनी’ हिरे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करीत ‘राष्ट्रीय डॉक्टर डे’ साजरा केला.
तीन वर्षांपासून लोक सेवा मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे रुग्णमित्र म्हणून रुग्णसेवा करीत आहेत. डॉक्टरांचे रुग्णसेवा साठी समर्पण तसेच देश व समाजासाठी देत असलेल्या अमूल्य सेवेबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी या रुग्ण सेवकांनी हा सत्कार कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमात मा. डॉ. सयाजी भामरे सर ( वैद्यकीय अधिष्ठाता ) , डॉक्टर अजितजी पाठक ( वैद्यकीय अधीक्षक ) व सर्व वैद्यकीय अधिकारी यांना प्रत्येक बाह्यरुग्ण विभाग व अंतररुग्ण विभागातील डॉक्टरांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सेवेचा सत्कार करण्यात आला.
येथे रुग्णमित्र हे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले जाते. चिट्टी कुठे काढायची, कोणता ओपीडी नंबर कुठे, कोणता वॉर्ड कुठे आहे, कोणती तपासणी कुठे होते, रक्ताची गरज असेल तर काय करावे अशा विविध गोष्टींची निस्वार्थपणे मदत व मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार मिळतो.
कार्यक्रमासाठी संजयजी देसले (धुळे शहर संघचालक) मनोजजी पाटील सर (धुळे शहर कार्यवाह) डॉ. विशालजी भट, सुरेंद्र जी काकडे, हर्षदजी पाटील, संतोषजी भावसार, राकेशजी भद्रे, कौस्तुभजी नागरे, किशोरजी भामरे, अरविंदजी चौधरी, बिपिनजी रोकडे, तसेच रुग्णमित्र अनिलकुमार बोपशेट्टी, वासुदेवजी शिंपी, सुनील दादा विसपुते, चंद्रकांतजी भामरे, किसनजी जाधव, गुलाबजी सुपनार, हेमंतजी कचवे, विजयजी मोरे, विनायकजी चव्हाण सर, गौतम जैन, प्रशांतजी साठमोहन, अशोकजी जाधव, हर्ष जैन, इंदिराताई महाले, हर्षादीदी जैन, ऋतुजादीदी जाधव, व सर्व रुग्णमित्रांची उपस्थिती होती.