धुळे जिल्हा
आषाढी एकादशी निमित्त शिंदखेडा तालुक्यातील विटाई जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांची विठू नामाची शाळा भरली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी अनेक संदेश दिले. विटाई गावात चिमुकल्यांची वाजत गाजत मिरवणूक पाहून गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य गावकरी व पालक वर्ग मिरवणूक पाहून स्वतः सहभागी झाले व टाळ मृदूंगासहित वारकरी संप्रदायाची विद्यार्थ्यांना आठवण करून दिली.
शाळेतील मुख्याध्यापक कमलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका जयश्री बोरसे व युवा प्रशिक्षणार्थी गायञी पाटील यांनी सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले..हा कार्यक्रम आषाढी एकादशीनिमित्त घेण्यात आला.यात टाळ मृदूंगाच्या गजरात विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस ठेवून विठू नामाचा गजर केला. कार्यक्रमात प्रारंभी विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर गावात मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणूकीत डोक्यावर तुळस ठेवत प्राणवायूसाठी झाडे लावा – झाडे जगवा हा संदेश दिला. तर काही विद्यार्थ्यांनी भजन किर्तन म्हटले.. याप्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थ्यासोबत फुगडी खेळत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.तसेच वारकरी संप्रदायाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.. गावातून प्रमुख मार्गावरून मिरवणूक जि. प. शाळेकडे वळत असतांना आजपर्यत असे कार्यक्रम जि. प. शाळेत होत नव्हते पण येत्या दोन वर्षात तुम्ही आजचा दिंडीचा कार्यक्रम घेऊन बालगोपालांमध्ये एक संस्कार रूजवण्याचे काम आणि आत्ताच्या या धावपळीच्या काळात नविन पिढीला महाराष्ट्राचे दैवत काय आहे याचे महत्व पटवून दिले.. खरंच माझ्याकडे शब्द नाहीत अशा प्रेमळ शब्दांत एक वृद्ध बाबा यांनी आम्हां शिक्षकांना थांबवून एक समाधानाची बातमी दिली व आमच्या कामाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता..या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला..जि. प. शाळेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पालकांसह गावकर्यांनी कौतुक केले.