धुळे शहर
भाजप संधी साधू पक्ष नसून राष्ट्रवादीला त्या पक्षांकडून नेहमीच सन्मापूर्वक वागणूक दिली गेली आहे.जवळपास आठ वर्षांनी स्थानिक पातळीवर निवडणूक होते आहे.दीर्घाकाळ निवडणूक झालेली नाही,त्यामुळे इचूकांची संख्याही अधिक असून यामुळे युतीला बाधा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. अशी भूमिका राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
स्थानिक स्वराज संस्थांनाच्या निवडणूक युतीत लढणार असल्याबाबत कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी आणि संघटनेचा आढावा घेण्यासाठी धुळे दौरा असल्याचे राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मेळाव्यासाठी आज तटकरे जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि जयघोषात तटकरे यांचे स्वागत झाले.
तटकरे म्हणाले,निवडणूकीची पूर्व तयारी आणि उत्तर महाराष्ट्रापासून पक्ष मजबूतची ही सुरुवात आहे. कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह असून ठिकठिकाणी त्या पद्धतीनेच स्वागत होतं असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी यावेळी केला.पक्ष नोंदणीचा आढावा घेणे आदी या दौऱ्यात केले जाणारं आहे.समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार दौऱ्याची रूपरेषा ठरली आहे.भाजप संधी साधू पक्ष नसून राष्ट्रवादीला त्या पक्षांकडून नेहमीच सन्मापूर्वक वागणूक दिली गेली आहे.जवळपास आठ वर्षांनी स्थानिक पातळीवर निवडणूक होते आहे.दीर्घाकाळ निवडणूक झालेली नाही,त्यामुळे इचुकांची संख्याही अधिक असून यमुळे युतीला बाधा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.आम्हाला एकमेकांची मदत मिळणार नाही हे मत चुकीचे ठरले आहे.युतीचे,आघाडीची निवडणुकीत अपरिहार्यता आहे.विधानसभा निवडणूक निकाल पाहता प्रमुख विरोधक दिसत नाही,पण पूर्ण ताकदीनेच आपण सामोरे जाणार आहोत.प्रवेश झालेले नवे आणि जुने असे सर्व एकत्र येऊन काम करतील यासाठीच खरेतर हा दौरा आहे.कोणाचा दबाव कोणावरही नाही अशी आजची परिस्थिती आहे.संग्राम जगताप यांची भूमिका ही पक्षाची नाही असे स्पष्ट करून तटकरे यांनी बलात्कार प्रकरणाच्या संदर्भात विकृत मनोरुत्ती ठेचून काढली पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त केले. इम्तियाज जलील हे नेते ते त्यांच्या पद्धतीने बोलले, फडणवीस अस का करतील असा प्रतिप्रश्नही तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.