आरंभ फाउंडेशन द्वारा डॉक्टर दिन व सी ए दिनानिमित्त शुभेच्छा देऊन सन्मान

 

धुळे शहर

आज दिनांक एक जुलै 2025 रोजी आरंभ फाउंडेशन द्वारा डॉक्टर्स डे व सीए डे निमित्ताने विविध मान्यवरांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्यात.

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील अधीक्षक डॉक्टर अजित पाठक, स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण मोरे, बालरोग तज्ञ नीता हटकर मॅडम, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर जीवन पवार, डॉक्टर नागे, डॉक्टर सुकळे व विविध विभागातील प्रमुख यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच जिल्हा रुग्णालय धुळे येथील डॉक्टर दत्तात्रय देगावकर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉक्टर स्वप्नील पाटील, मानसोपचार तज्ञ डॉक्टर विजय साळुंखे, डॉक्टर वाघ व जिल्हा रुग्णालय धुळ्यातील ओपीडी विभागातील डॉक्टर यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सी ए तसेच अर्थालय ग्रुप प्रमुख श्री जी बी मोदी सर, नरेंद्रजी नेरपगार सर धुळे सि.
ए ब्रांच येथील शाखा अध्यक्ष यश आचार्य, सोनी सोनार, यश पटवारी, कपिल तुलसानी, आयुष अग्रवाल, नारायण अग्रवाल, प्रितेश चिंचोले, निखिल अग्रवाल या सी.ए बंधूंचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी आरंभ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शेवतकर, सदस्य संदीप कोडगीर, राजू पवार, धुळे रुग्णसेवक अशोक जाधव, सुनील विसपुते, विलास विसपुते, चंद्रकांत भामरे, प्रशांत साठमोहन, किसन जाधव, हर्षदा जैन, गुलाब सुपनर, इंदिरा महाले, ऋतूजा जाधव, किशोर भामरे, अनिल बोपशेट्टी, गौतम जैन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *