धुळे शहर
येथील गुलमोहर शासकीय विश्राम गृहात सापडलेल्या एक कोटी, ८४ लाख, ८४ हजार, २०० रुपयाच्या घबाड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करावां असे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे आज माजी आमदार तथा शिवसेनेचे (उबाठा) नेते अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांनी तब्बल ३३ दिवस, आरोपींना पळापळ करण्यास व पूरावे नष्ट करण्यास भरपूर संधी दिली असून ’अब होगा दूध का दूध और पाणी का पाणी’ असे म्हणत आपण वकील न लावताच भयंकर आजारी असतानाही स्वतः न्यायालयात ही केस लढवत असल्याचे ही आवर्जून सांगितले.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की २१ व २२ मे च्या मध्यरात्री गुलमोहर रेस्ट हाऊस मध्ये एक कोटी, ८४ लाख, ८४ हजार, २०० रुपये बेहिशेबी सापडले आहेत.
या घटनेच्या अनुषंगाने माजी आमदार गोटे यांनी म्हटले आहे,की आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या अंदाज समितीला लाच देण्याकरता जवळपास १५ कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. १५ कोटी रुपयांचे उद्दिष्टची पूर्तता व्हावी, यासाठी अर्जुन खोतकर यांचे कथित स्वीय सहाय्यक किशोर काशिनाथ पाटील हे १५ मे पासूनच धुळे मुक्कामी येऊन बसले होते. पैसे गोळा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शेलार यांच्या कार्यालयात बसून जिल्हाभर सर्व अधिकार्यांना फोन लावून आणि धमकावण्यात आले.
तुमच्यावर कारवाई करू,अन्यथा तुम्ही एवढे, एवढे पैसे धुळ्यात किशोर पाटील यांच्याकडे जमा करा अन्यथा तुमची धडकत नाही. अशा उघड उघड धमक्या दिल्या. अशा प्रकारे त्यांनी खंडणी गोळा केली जात होती.
यासंदर्भात याची माहिती अनिल गोटे यांना २० मे रोजी महसूल विभागाच्या एका शिपायाने फोन करून सांगितले,की आर.डी.सी. साहेबांच्या कार्यालयात प्रचंड पैसे गोळा केले जात आहेत. अर्जुन खोतकर यांचे पी.ए. १५ तारखेपासून येथे ठाण मांडून बसले आहेत.या पैशाचे वाटप उद्या २१ मे रोजी केले जाणार आहे. अनिल अण्णा गोटे यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला २१ रोजी सकाळी आठ वाजेपासून रेस्टहाऊसवर बसायला सांगितले. या कार्यकर्त्याने दुपारी चार वाजता फोन करून ’येथे पाच साडेपाच कोटी रुपये गोळा झाले’ असे सांगितले.तद्नंतर अनिल गोटे यांनी पत्रकारांना फोन करून बोलावून घेतले आणि ते पत्रकारांना घेऊन रेस्ट हाऊसच्या १०२ नंबर कक्षाजवळ पोहोचले. या ठिकाणी खंडणी गोळा केली होती.
त्या ठिकाणी गेले असटा या रेस्ट हाऊसला खाजगी कुलूप लावून, किशोर पाटील फरार झाले होते. अनिल गोटे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना या ठिकाणी असे असे पाच ते साडेपाच कोटी रुपये गोळा करण्यात आले असे सांगितल्यावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दहा मिनिटात येतो सांगितले. परंतु सकाळी पाच वाजेपर्यंत ते आलेच नाही.
अखेर रात्री ११ वाजून २० मिनिटांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. काळे आल्यावर, त्यांनी १ कोटी, ८४ लाख, ८४ हजार, २०० रुपये ताब्यात घेतले. मात्र तत्पुर्वी बंद कुलुपाचा पंचनामा करणे, हाताचे ठसे घेणे, वगैरे काही पूर्तता केली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की, पोलीस आधीच आरोपींना फितूर झाले होते. अखेर पोलिसांनी तब्बल १२ दिवसानंतर, बॉम्बे पोलीस ऍक्ट च्या कलम १८४ खाली अदखलपात्र गुन्हा दाखल करून आपल्या मदतीची प्रदक्षिणा पूर्ण केली.
माध्यमांमध्ये याबद्दल बरीच आरडा ओरड झाली. माध्यमांनी सदर प्रकरण लावूनपण धरले. परंतु निगरगट्ट सरकारने अजिबात दाद दिली नाही. अखेर अनिल अण्णा गोटे व त्यांचे शिवसेनेचे सहकारी नरेंद्र परदेशी, तत्कालीन विरोधी पक्षनेते, महानगरपालिका व उपजिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी चौगुले साहेब यांच्या न्यायालयात दाद मागितली असता, माननीय न्यायालयाने आज दि. २७ रोजी सदर प्रकरणी, भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १७४, १७३, २१० ब, व १७५ (३) कलमाखाली तातडीने गुन्हा दाखल करून, एफ.आय.आर. नोंदवण्याचे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत. असा दावा गोटे यांनी यावेळी केला.