धुळे शहर
धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल रेसीडेन्सी समोर धुमस्टाईल मोबालईल हिसकावून पळून गेलेल्या तिघांचा शोध लावत दोघांना जेरबंद करण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे.
दि. २७ मे रोजी सायंकाळी हिरामण ताराचंद गायकवाड रा.आण्णासाहेब पाटील, धुळे यांचा मोबाईल हॉटेल रेसिडेन्सी समोरुन अज्ञात तिन जणांनी हिसकावून चोरी केला होता. याप्रकरणी मोहाडी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी विशेष पथकाची नेमणुक केली. या पथकातील अंमलदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समीर खान सलीम खान (वय २१) रा.जाफर नगर, मालेगाव, सैय्यद दाऊद सैय्यद इब्राहीम (वय १९) रा.आदम नगर, मालेगाव व महेफुस पुर्ण नाव माहित नाही रा.सुरत यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. यातील समीर खान सलीम खान व सैय्यद दाऊद सैय्यद इब्राहीम या दोघांना दि. २४ जून रोजी मालेगांव येथून ताब्यात घेण्यात आले. तर तिसरा साथीदार हा अद्याप फरार आहे. संशयीत आरोपींकडून २० हजाचारा मोबाईल आणि आणखी एक मोबाईल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील, पोसई चेतन मुंढे, हे कॉ. पंकज चव्हाण, नरेशकुमार चव्हाण, पो कॉ. मनिष सोनगीरे, पो कॉ. मुकेश मोरे, प्रकाश जाधव, सुमित चव्हाण, चेतन झोळेकर, जितेंद्र सैंदाणे यांनी केली.