शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, रोटावेटर, टॅकर चोरीचा उलगडा धुळे एलसीबी ने १० लाखाच्या साहित्यासह तिघांना पकडले

 

धुळे जिल्हा

शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर आणि पाण्याचे टँकर चोरी करणार्‍या तिघा सराईत गुन्हेगारांना धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० लाख १० हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. संशयितांनी त्यांच्या अन्य चार साथीदारांच्या मदतीने चोर्‍या केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली अशी माहिती आज पोलिसांनी दिली.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात कर्ले गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळून अज्ञात चोराने १५ मे रोजी पाण्याचे टँकर लांबविले. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने सुरु केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनां २७ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राहुल ऊर्फ गोलु गणपतसिंग गिरासे (वय-२६) रा.दराणे (ता. शिंदखेडा), प्रशांत ऊर्फ गोलु समाधान पाटील (वय-२५ वर्ष) रा.निशाणे ता.शिंदखेडा व चेतन ऊर्फ बंटी योगेश पवार (वय-१९ वर्ष) रा.दराणे (ता.शिंदखेडा) यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची विचारपुस केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार अनिल भिल,रा.साळवे (ता.शिंदखेडा), कालु भिल, दादु ऊर्फ चोख्या कोळी रा.साळवे (ता.शिंदखेडा) आणि टँकर विकत घेणार उमेश राजेंद्र पाटील रा.निशाणे (ता.शिंदखेडा) यांचेसह गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या संशयितांकडून १० लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस अंमलदार संजय पाटील, सचिन गोमसाळे, प्रशांत चौधरी,संतोष हिरे,सुरेश भालेराव,चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, विनायक खैरनार व हर्षल चौधरी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *