आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी करणार सन्मान

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी करणार सन्मान व आणीबाणीवरील प्रदर्शनाचे आयोजन

धुळे जिल्हा

सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत धुळे जिल्ह्यातील कारावास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा आज बुधवार, 25 जून, 2025 रोजी सकाळी 12.00 वाजता नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.

देशात सन 1975 ते 977 मध्ये लागलेल्या आणीबाणी कालावधीत लढा देताना धुळे जिल्ह्यातील व्यक्तींनी सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे. या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून यथोचित गौरव करण्याचे शासनाने ठरविले आहे. जिल्ह्यातील या व्यक्तींचा सन्मान जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आणीबाणीतील गौरवमुर्तींचे चित्रप्रदर्शन

या कार्यक्रमाच्यावेळी जिल्ह्यातील आणीबाणीत कारावास भोगलेल्या गौरवमुर्तींवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले असून या प्रदर्शनाचाही लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *