धुळे जिल्हा
धुळे तालुक्यातील अनुसुचीत क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व 131 ग्रामपंचायतीकरीता अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच महिला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवार, 3 जुलै, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, धुळे ग्रामिण येथे आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
*या ग्रामपंचायतीची होणार आरक्षण सोडत*
अजंग/कासविहीर, अजनाळे, अनकवाडी, अंचाळे, आर्वी, अकलाड, आमदड/ वजीरखेडे, आर्णी, आंबोडे, इसरणे, उभंड, उडाणे, कापडणे, काळखेडे, कावठी, कुळथे, कुंडाणे (वरखेडी), कुंडाणे (वार), कुसुंबा, कुंडाणे (वेल्हाणे), कौठळ, खेडे/ सुट्रपाडा, खोरदड, खंडलाय खु., खंडलाय बु., बांबुले प्र. नेर, गरताड, गोताणे गोंदुर, चिंचखेडे, चिंचवार, चांदे, चौगाव/हिंगणे, जुनवणे, जापी, जुन्नेर, तरवाडे, तिखी, मोरदडतांडा, अंचाळेतांडा, दहयाणे, दापुरा/दापुरी, देवभाने, देऊर बु., दोंदवाड, देऊर खु. धनुर/ लोणकुटे धमाणे/ धमाणी/ धोडी, धामणगाव, धाडरा धाडरी, नरव्हाळ, नगाव/ तिसगाव/ वडेल/ ढंढाणे, नवलाणे, नाणे, नावरा, नावरी, निमडाळे, न्याहळोद, निकुंभे नेर/म.पांढरी वैगरे निमगुळ, नंदाळे बु., नंदाळे खु. नांद्रे/पुनितपाडा, नंदाणे, पाडळदे, पिंपरखेडे, पुरमेपाडा, फागणे, बल्हाणे, बाबरे, बाभुळवाडी, बिलाडी, बुरझड, बेहेड, बोरसुले / नवेकाठारे बेंद्रेपाडा, बोरीस, बोदगाव/वणी खु. बोरविहीर, बोरकुंड, होरपाडा, रतनपुरा, भदाणे, भिरडाणे/ भिरडाई, मळाणे, मुकटी, मेहेरगाव, मोरदड, मोराणे प्र.नेर, मोहाडी प्र.डा., मोरशेवडी, मोघण, मांडळ, रामी, रावेर, रानमळा, लळींग / दिवानमळा, लामकानी, लोहगड, लोणखडी, वडणे, वडजाई, वणी बु., वडगाव, वार, विश्वनाथ/सुकवड, विंचुर, वेल्हाणे बु., शिरुड, शिरधाणे प्र. नेर, शिरधाणे प्र.डा. सडगाव / हेंकळवाडी, सरवड, सावळदे, सावळी / सावळीतांडा, सायने, सातरणे, सांजोरी, सिताणे, सैताळे, सोनगीर, सौंदाणे, सोनेवाडी, हडसुणी, हेंद्रुण, हेकळवाडी/तामसवाडी, तांडा (कुंडाणे), नवलनगर, निमखेडी, या गावातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे.
धुळे तालुक्यातील सर्व पक्ष प्रमुख, स्थानिक स्वराज सस्थांचे सदस्य/पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे. असे आवाहन तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांनी केले आहे.