धुळे – नरडाणा – बाभळे येथील उद्योजकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार -खासदार डॉ. शोभा बच्छाव

धुळे – नरडाणा – बाभळे येथील उद्योजकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार -खासदार डॉ. शोभा बच्छाव

• धुळे – नरडाणा – बाभळे MIDC येथील उद्योजकांची बैठक उत्साहात संपन्न..!

• खासदारांनी घेतला अनुपस्थित अधिकाऱ्यांचा समाचार ..! यापुढे कायदेशीर हक्कभंग दाखल करणार..!

धुळे

धुळे – नरडाणा – बाभळे औद्योगिक वसाहतीत (MIDC) येथे औद्योगिक वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, रस्त्यांची व गटारींची समस्या, व्यापाऱ्यांना व उद्योगपतींना गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून गुंडगिरी केली जाते आणि धमकी -दमदाट्या करून खंडणी मागितली जाते . अश्या विविध प्रकारच्या समस्या उद्योजकांनी आज खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांच्या समोर मांडत, त्यावर उपाय योजना करण्याची मागणी केली.  या बैठकीकडे काही अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे खासदार डॉ बच्छाव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अश्या अधिकाऱ्यांवर यापुढे कायदेशीर हक्कभंग दाखल करणार असा इशारा दिला.

आगामी काळात दिनांक ३० जून पासून मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन तर दिल्ली येथे २१ जुलैपासून संसदीय लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या दोन्ही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे – नरडाणा – बाभळे एम.आय.डी.सी येथील उद्योजकांची बैठक घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.

याप्रसंगी एम.आय.डी.सी परिसरात चांगले रस्ते पिण्याचे पाणी व विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची भूमिका खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी घेतली आहे. एम.एस.सी.बी विभागाने एम.आय.डी.सी परिसरात उद्योगांसाठी अखंडितपणे विज पुरवठा सुरळीत राहील यासाठी विशेष प्रयत्नशील राहण्याच्या सूचना डॉ. बच्छाव यांनी एम.आय.डी.सी विभागाला केल्या आहेत. उद्योजकांना त्रास दिला जात असल्यास तात्काळ पोलीस दलाकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन देखील याप्रसंगी करण्यात आले आहे. दरम्यान उद्योजकांशी संवाद साधित त्यांच्या विविध अडीअडचणी याप्रसंगी समजून घेण्यात आल्यात उद्योजकांनीही अडीअडचणीसह विविध संकल्पना याप्रसंगी खासदार महोदयांकडे मांडणी केली आहे. दरम्यान उद्योजकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही याप्रसंगी खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी उद्योजकांना दिली आहे. तर उद्योजकांनी ही रोजगारात स्थानिकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून करून द्यावी अशी साद खासदार डॉ.बच्छाव यांनी यावेळी उपस्थित उद्योजकांना घातली आहे. एम.आय.डी.सी विभागाचे अधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी व व्यापारी संघटनेचे पदधिकारी उपस्थित होते.

धुळे – नरडाणा – बाभळे MIDC येथे औद्योगिक वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे उद्योजकांचे नुकसान होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर यंत्रात अर्धवट प्रक्रिया झालेला कच्चा माल अडकून पडतो त्यामुळे तो फेकावा लागतो. तसेच यंत्र बंद पडल्यावर त्यातील माल पुन्हा काढून यंत्र स्वच्छ करावे लागते आणि पुन्हा सुरू करण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो त्यामुळे उत्पादन ठप्प होते. यावर MSEB यांनी तात्काळ उपयोजना कराव्यात. यासाठी स्वतंत्र १३२ kv चे सब स्टेशन उभारणार असल्याचे देखील सांगण्यात आले.

MIDC धुळे व नरडाणा येथे रस्त्यांची व गटारींची समस्या आहे. गटारीतून सांडपाण्याच्या आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही यामुळे रस्त्यावर पाणी जमा होते अश्या तक्रारी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. नरडाणा येथे मुंबई आग्रा मुख्य हायवे क्र. ३ पासून ते जिंदाल पाँवर प्लांट, अल्ट्राटेक सिमेंट, वंडर सिमेंट येथून माल ने – आण करणारे व वाहतूक करणारे रस्ते प्रचंड प्रमाणात खराब झालेले आहेत त्यांचा प्रस्ताव सादर करावा. MIDC मध्ये व्यापाऱ्यांना व उद्योगपतींना गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून गुंडगिरी केली जाते आणि धमकी -दमदाट्या करून खंडणी मागितली जाते अश्या तक्रारी पोलीस अधिकारी यांनी तात्काळ नोंदवाव्यात. तसेच रावेर MIDC चे धुळे MIDC विस्तारीकरण करणे व नवीन उद्योग व उद्योजकांना चालना देणेबाबत येणाऱ्या अडी अडचणी यावर देखील चर्चा करण्यात आली. बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांबाबत खासदारांनी नाराजगी व्यक्त केली आणि यापुढे असे झाल्यास कायदेशीर हक्कभंगाची कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, राजेश गिंदोडीया, सुभाष कोटेचा, वर्धमान सिंघवी, प्रशांत देवरे, कैलास अग्रवाल, भरत अग्रवाल, राजेश गिंदोड़िया, राजेश भतवाल, राजेश वाणी, वसंतलालजी अग्रवाल, अरुण केले विष्णु फाफट, संतोष अग्रवाल, संजयजी अग्रवाल, गोवर्धन मोदी, विजयजी चौधरी, हेमंत जैन, प्रदेश कॉंग्रेस समितीचे युवराज आबा करनकाळ, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, डॉ.दरबार सिंग,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे,सुनिल शिंदे,राजेंद्र खैरनार, MIDC प्रादेशिक अधिकारी दिंगबर पारधी, उप कार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील. मोहाडी पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, MSEB चे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री महाले, वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, NHAI चे हितेश अग्रवाल,नितीन महाले आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *