धुळे जिल्हा
जिल्हा परिषद शाळा विटाई येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या नवांगतांचे घोड्यावर बसून वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
दिनांक 16/6/2025 रोजी जि. प. शाळा विटाई येथे शाळा शुभारंभाच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील व इतर इयत्तातील नविन विद्यार्थी यांचे घोड्यावर बसून व वाजञीसह गावातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.त्यानंतर नवांगतांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व इयत्ता पहिलीत विद्यार्थ्याचे शाळेतील पहिल्या पाऊलाचे ठसे घेऊन प्रवेश करण्यात आला.
, तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट मोजे व पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या शाळाशुभारंभाच्या कार्यक्रमास सरपंच लिलाधर खैरनार, उपसरपंच संजय शिरसाठ, ग्रा. पं. सदस्य महादू अहिरे, शा. व्य. समिती अध्यक्ष सुनिल शिरसाठ, प्रविण शिरसाठ, साधन व्यक्ती महाले सर, नाना फुलपगारे, बाबुराव भिल, दामू पवार, संतोष मोरे, निर्मला कुवर, वैशाली खैरनार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूञसंचालन मुख्याध्यापक कमलेश चव्हाण यांनी तर आभार उपशिक्षिका जयश्री बोरसे यांनी मानले.. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशिक्षणार्थी गायञी पाटील यांनी परिश्रम घेतले.