अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना एबी फाउंडेशनतर्फे धुळ्यात श्रद्धांजली

धुळे शहर

गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग ७८७ ड्रीमलाइनर या विमानाचा गेल्या गुरुवारी (ता. १२) अपघात होऊन २४२ प्रवाशांसह अन्य नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या सर्व निष्पाप नागरिकांना आज येथील एबी फाउंडेशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत सहवेदना व्यक्त केल्या.

अहमदाबाद येथून लंडनकडे २४२ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या एअर इंड्याच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड होत अवघ्या पाच मिनिटांत हे विमान अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात कोसळले होते. या विमानात भारतासह विदेशातील एकूण २४२ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात यात सर्वांचा करुण अंत झाला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सायंकाळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनतर्फे शहरातील गुरू-शिष्य स्मारकाजवळ कार्यक्रम झाला. यामध्ये सर्व उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत मृतांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल, एबी फाउंडेशनच्या संचालिका अल्पा अग्रवाल, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी भीमसिंह राजपूत, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या वैशाली शिरसाट, माजी नगरसेविका आरती पवार, प्रभा परदेशी, माजी महापौर प्रदीप कर्पे, जितेंद्र चौवटिया, शशी मोगलाईकर, महेश मिस्तरी, संजय बोरसे, यशवंत येवलेकर, नंदू सोनार, अरुण पवार, चेतन मंडोरे, भिकन वराडे, कमलाकर अहिरराव, पवन जाजू, पृथ्वीराज पाटील, दिनेश पारख, राजेंद्र अग्रवाल, प्रमोद चौधरी, प्रा. सागर चौधरी, चंद्रकांत महाजन, किरण जोंधळे, शिवाजीराव चौधरी, अमित पवार, महेश मुळे, ॲड. किशोर जाधव, विकी परदेशी, किशोर चौधरी, विजय पवार, अनिल सोनार, निलेश देसले, प्रीतेश अग्रवाल, बिपीन रोकडे, तुषार भागवत, महेंद्र भामरे, रामा भडागे, मोहित देसले, करण लोंढे, लोकेश चौधरी, भटू गवते, सुनील कोठावदे, अमोल सूर्यवंशी, विनायक अहिरे, उमेश चौधरी, सचिन मराठे, राहुल चौधरी, अमोल मराठे, जयेश वावदे, राहुल परदेशी, देविदास लोणारी, निलेश राजपूत, भीमा शर्मा, अशोक माळी, रमेश करनकाळ, नंदू ठोंबरे, जीवन शेंडगे, जयंत वानखेडकर यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *