पोलिस असल्याचे भासवून धुळ्यात 14 तोळे सोन्याचे दागिने लांबवले

धुळे शहर

पोलिस असल्याचा बनाव करत दुचाकीवर आलेल्या दोघांनी वृद्ध महिलेला दंगल झाल्याची थाप मारून दागिने सुरक्षित ठेवायला सांगितले आणि काही कळण्याच्या आत हातोहात तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना धुळे शहरातील देवपूर भागात शनिवारी सकाळी घडली.

धुळे शहरातील देवपुरातील श्रीरंग कॉलनीत वास्तव्यास असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन ढोले यांच्या आईवर हा प्रसंग गुदरला, त्या १४ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पायी जात असतांना मोटार सायकलवर आलेल्या दोन ठगांनी त्यांना अडविले. आपण पोलिस असल्याचा बनाव करत शहरात दंगल सुरू आहे यामुळे आपण आपल्याजवळील दागिने लपवा असे त्यांनी डॉ. ढोले यांच्या आईला सांगितले. हे दागिने रुमालात गुंडाळून ठेवा असे सांगण्यात आल्याने त्यांनी स्वतःजवळचे दागिने रुमालात गुंडाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांना तोतयांनी हातचलाखी करून हे दागिने स्वतःकडे घेतले आणि फक्त गुंडाळालेला रुमाल हातात ठेवून दोन्ही पसार झाले. घरी आल्यानंतर रुमाल उघडल्यावर आत काहीही गुंडाळालेले नसल्याचे उघड झाले आणि श्रीमती ढोले यांना धक्काच बसला.या दागिण्यांची किंमत सुमारे १४ लाख रुपये असल्याचे फही सांगण्यात आले. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *