धुळे जिल्हा
भाजपा उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या पक्ष कार्याची विशेष दखल घेत सत्कार करण्यात आला. धुळे शहर विभागात भाजपचे निर्धारित टार्गेट पेक्षा तब्बल 145 टक्के अधिक सदस्य नोंदणी आणि बूथ रचनेत सुध्दा जोरदार कामगिरी बजावली गेल्याने पक्ष नेतृत्वाकडून गजेंद्र अंपळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
भाजपा उत्तर महाराष्ट्र विभाग जळगाव येथे आज दि. 14 जून 2025 रोजी आढावा बैठकीत धुळे महानगराचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण आणि उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या हस्ते यथोचित सन्मान व भव्य सत्कार करण्यात आला.

गजेंद्र अंपळकर यांचे पहिल्या कार्यकाळातील संघटनात्मक कामाचा तसेच कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यात तसेच धुळे शहर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभुमीवर त्यांची पुनश्चम एकदा अध्यक्ष म्हणून दुसर्या कार्यकाळासाठी निवड करण्यात आली. याबद्दल गजेंद्र अंपळकर यांचा सत्कार करण्यात आला. धुळे शहर विभागात भारतीय जनता पक्षाचे सुमारे 86 हजार सदस्य नोंदणी झाली. हे काम 100% पेक्षा जास्त होते. तसेच धुळे शहरात 264 बूथवर भाजपचे बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख व सहकारी सदस्य रचना सुद्धा केली गेली. या सर्व कामाची दखल घेतली गेली. आणि संघटनात्मक कामाचे कौतुक केले गेले.
या प्रसंगी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस सौ. माधवीताई नाईक, ज्येष्ठ नेते हिरामणआप्पा गवळी, प्रदेश चिटणीस डॉ. सुशिल महाजन, माजी महापौर प्रदीपनाना कर्पे, सौ. जयश्रीताई अहिरराव, मंडल अध्यक्ष अमोल मासुळे, पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, मंडल पदाधिकारी निरज देसले, कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. किशोर जाधव, इत्यांदी मान्यवरांची उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचा भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला.