भाजपच्या पश्चिम मंडळातर्फे मोदी सरकारच्या ११ वर्षे पूर्तीनिमित्त होणार विविध उपक्रम

भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक

धुळे शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या येथील पश्चिम मंडळातर्फे २५ जूनपर्यंत विविध उपक्रम होणार आहेत. यात पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल,शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमांबाबत रविवारी (ता. ८) पश्चिम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या उपक्रमांतून देशातील मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

भाजपच्या पश्चिम मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तीत माजी नगरसेवक शशी मोगलाईकर, हर्षकुमार रेलन, माजी सभापती सुनील बैसाणे, माजी नगरसेविका योगिता बागूल, माजी नगरसेवक बन्सीभाऊ जाधव, राकेश कुलेवार, संतोष खताळ,प्रशांत बागुल,निलेश नेमाने, तसेच खालील प्रमाणे बूथ प्रमुख सौ.सुनीता सोनार, संदीप बैसाणे, मुकेश थोरात, गोविंदा सोनवणे, चंद्रकांत पाटील, मनोज पिसे, शांताराम नेरकर, प्रशांत सूर्यवंशी, सुनील पाटील, किसन जाधव, राजेंद्र माने, योगेश मुकुंदे, जितेंद्र अमृतकर, चंद्रकांत भामरे, अशोक जाधव, निनाद पाटील, दिग्विजय गाळणकर,दीपक कोळी, भिलेश खेडकर, दाजभाऊ महाले, अमन मुलके, अजय बागूल, अरविंद पवार, संजय शर्मा, गुलाब सुपनर,गोपाल रासकर,प्रदीप काळे,नितीन बडगुजर,विनोद जोशी, रवींद्र बोरसे, देविदास जाधव, विवेक जाधव, निलेश सैंदाणे, वासुदेव शिंपी, रितेश लंगोटे,प्रणव घोलप आदी उपस्थित होते.

प्रारंभी श्री. मासुळे यांनी अभियानाची संकल्पना स्पष्ट करत मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मंडळातर्फे पक्षाच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल,शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, तसेच पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाकडून येणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून या योजनांचा लाभही मिळवून दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेली ११ वर्षे देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू आहे. आज आपण अनेक क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनत आहोत. यामुळे देशाला कणखर नेतृत्व लाभले आहे.

स्थायी समितीचे माजी सभापती सुनील बैसाणे यांनी सांगितले, की लवकरच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे. विशेषतः बूथप्रमुखांवर मोठी जबाबदारी असेल. आपल्याला आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह शीर्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक जिंकायचीच आहे. त्यासाठी सर्वांनी कठोर मेहनत घेण्यास तयार राहावे.
माजी नगरसेवक शशी मोगलाईकर म्हणाले, की आमदार अनुप अग्रवाल व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात आपण पक्षाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत आहोत. केंद्रातील मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपण सर्वांनी मोदी सरकारच्या प्रत्येक देशहिताच्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारत एक मजबूत राष्ट्र म्हणून उदयास येत असून, देश प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे एक-एक शिखर गाठत आहे. भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनत आहे. याची प्रचिती नुकतीच भारताने पाकिस्तावर सिंदूर ऑपरेशनअंतर्गत केलेल्या कारवाईतून दिसून आली.
यावेळी श्री. मोगलाईकर यांनी केंद्र सरकारच्या ११ वर्षपूर्ती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रत्येक उपक्रमासाठी प्रमुखाची निवड करत त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुकुंदे यांनी आभार मानले.

अभियानांतर्गत होणारे उपक्रम पुढीलप्रमाणे – 
९ जून ते १५ ऑगस्ट- एक झाड–आईच्या नावाने या मोहिमेंतर्गत मिलपरिसरात विविध ठिकाणी मंडल अध्यक्ष अमोल (बंटी) मासुळे यांच्या नेतृत्वात,प्रभाग सातमधील गुरूनानक सोसायटी, गणेश कॉलनी, साक्री रोड परिसरात हर्षकुमार रेलन यांच्या नेतृत्वात उत्कर्षनगर, जवाहरनगरमध्ये बन्सीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात, देवचंदनगरमध्ये प्रशांत बागूल, श्रीनगर, राजहंस कॉलनी, संभाप्पा कॉलनीत संदीप बैसाणे, प्रणव घोलप, शशी मोगलाईकर, जितेंद्र अमृतकर यांच्या नेतृत्वात, जय मल्हारनगरमध्ये सुनीता सोनार, महेश्वर कॉलनी, चितोड रोड परिसरात निलेश नेमाणे, संतोष खताळ, अशोकनगरमध्ये राज माने, गोकुळनगरमध्ये किसन जाधव यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण
९ जून ते ९ जुलै- बदलता भारत- मेरा अनुभव या विषयावर आपल्या भागात झालेल्या, होणाऱ्या बदलांसंदर्भात व्हीडीओ बनवून तो My Gov या पोर्टलवर अपलोड करून डिजिटल प्रतियोगितेत सहभागाची संधी- अधिक माहितीसाठी प्रणव घोलप यांच्यांशी संपर्क साधावा.
१२ जून १४ जून- राकेश कुलेवार यांच्या नेतृत्वात मंडळ संकल्प सभा.
१५ ते १७ जून- पश्चिम मंडळात निलेश नेमाणे यांच्या नेतृत्वात आयुष्यमान कार्डचे वाटप.
२१ जून- नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हर्षकुमार रेलन यांच्या नेतृत्वात योग दिन.
२३ जून- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमोल (बंटी) मासुळे यांच्या नेतृत्वात बलिदान दिन.
६ जुलै- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त संतोष खताळ यांच्या नेतृत्वात कार्यक्रम.
२५ जून- सुनील बैसाणे यांच्या नेतृत्वात देशात आणी-बाणी काळात कारागृहाची सजा झालेल्या माजी सैनिकांचा घरोघरी जाऊन सत्कार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *