धुळे जिल्हा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी स्वंयसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचे वाटप योजनेतंर्गत धुळे तालुक्यातील मांडळ येथील गौतम बुद्ध महिला बचतगटास मंजूर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वितरण करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, साक्री रोड, धुळे येथे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. संजय सैंदाणे यांच्या हस्ते बचतगटाच्या अध्यक्ष व सचिवांना ट्रॅक्टरची चावी सुपूर्त करण्यात आली.
यावेळी गौतम बुद्ध महिला बचतगटाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक लेखाधिकारी योगेश चौधरी, वरिष्ठ लिपीक संजय चौधरी, राजेश काळे, तसेच महामंडळातील कर्मचारी उपस्थित होते. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.