धुळे शहर
धुळे शहरातील नकाणे तलाव परिसरात रविवारी पार्टी करायला आलेल्या सुमारे 30 हुल्लडबाज तरुणांवर डीवायएसपी सागर देशमुख यांच्यासह धुळे तालुका पोलिसांनी कारवाई केली. यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
संबंधीत सर्व तरुणांना ताब्यात घेवून त्यांच्या आई-वडीलांना पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. पार्टी करणारे संबंधीत तरुण हे मद्यधुंद अवस्थेत दारुच्या बाटली आणि सिगारेटच्या पाकीटासह आढळून आल्याने त्यांच्यावर दारुंबदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसारे तालुका पोलिस हे नकाणे तलाव परिसरात गेले असता त्या ठिकाणी काही मुलं मद्यधुंद अवस्थेत आढळून आली. ती त्याठिकाणी पार्टी करत होती. त्यांच्याकडे सिगारेटची पाकीटं देखील आढळून आली. हे सर्व हुल्लडबाज तरुण धुळे शहरातील तसेच आजूबाजूच्या गावातील होती. तरी पोलिसांनी आवाहन केले आहे. की, तरुणांना अशा ठिकाणी पार्टी ला जावू नये दारुचे व्यसन करु नये अन्यथा तुम्हालाही कारवाईला सामोरे जावे लागेल. अशी माहिती धुळे तालुकापोलिस स्टेशनचे एनचार्ज तथा डीवायएसपी सागर देशमुख यांनी दिली आहे.