धुळे जिल्ह्यात वादळी पाऊस, धुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली, वीज पुरवठा खंडित

धुळे शहर

वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसाने धुळे जिल्ह्यात जोरदार तडाखा दिला आहे. धुळे शहर आणि तालुक्यातील अनेक गावासह परिसरात मुसळधार पाऊस पडला तसेच वादळी वाऱ्यामुळे अनके ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, धुळे शहरात झाडे पडल्याने वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.

धुळे शहर आणि जिल्ह्यात दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. धुळे शहर, धुळे तालुक्यातील गाव खेड्यात पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी तडाखा दिला. तसेच जोरदार वादळात झाडे पडून तसेच वीज तारा तुटून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. धुळे महापालिका समोर एक मोठे झाड पडले तसेच एसआरपी पेट्रोल पंपासमोर झाडे पडली , त्यात वीज तारा तुटल्या असून साक्री रोडवर सुद्धा 3 ते 4 झाडे पडली आहेत. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. महापालिका आणि वीज कर्मचाऱ्यांनी ही झाडे हटवण्यासाठी काम सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *