शिवरायांच्या पुतळ्यास आ.अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक करीत छावा संघटनेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

धुळे जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन धुळे शहरात आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचामृत आणि दूधाभिषेकाने साजरा करण्यात आला. आज सकाळी मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या या सोहळ्याचे आयोजन छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब कदम यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी केले होते.

यावेळी नानासाहेब कदम म्हणाले, गेल्या तेरा वर्षापासून छावा संघटनेच्या माध्यमातून हा पवित्र आणि ऐतिहासिक दिवस उत्साहात साजरा केला जातो. यावेळी उपस्थित शिव प्रेमी शिवमय वातावरणात शुभेच्छा देतात आणि महाराजांच्या ऐतिहासिक कामागिरीची यानिमित्त दीर्घ चर्चा घडून येते. यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते. ६ जून १६७४ रोजी राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. संपूर्ण हिंदुस्थानच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या या ऐतिहासिक दिवशीच महाराजांना छत्रपती हे पद मिळाले आणि ते संपूर्ण हिंदुस्तानचे राजे म्हणून घोषित झाले. छत्रपती शिवरायांनी मुघल राजवट भुईसपाट केल्यावर मराठा साम्राज्याची घोषणा केली ती याच दिवशी. यां ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आजच्या दिवसाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने शिवबा राजांच्या उतुंग कामागिरीतून शाहजी महाराजांनी पाहिलेले दिव्य स्वप्न साकार झाले.

यावेळी बापूसाहेब देवरे, दिलीप पाटील, कमलाकर पाटील, सुबोध पाटील,राजेश ईश्वर पवार, डॉ.योगेश ठाकरे, सुधीरभाऊ मोरे, ऍड नितीन पाटील, हेमंत भडक, अँड. दिनेश काळे, ऍड नामदेव मोरे, बापूसाहेब पाटील, मनोज ढवळे, ज्ञानेश्वर पाटील, राजू आवटे, साहेबराव देसाई, भिकन पाटील, राजू गायकवाड, रवींद्र पाटील,कैलास शिंदे, अकबर शेख, मनोज पवार, नाना पाटील, राज मोरे,नारायण पाटील, राजू मोरे, एम एस पाटील,बंडू महाजन, अधिकारी निंबा पाटील, अशोक लाला पाटील, राजेंद्र श्रीपत मोरे,अशोक समोडेकर, तन्मय जोशी, पंकज चौधरी, चंद्रकांत महाजन, निलेश राजपूत यांच्यासह अन्य मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *