छावा संघटनेतर्फे उद्या शिवरायांचा पंचामृताने अभिषेक

छावा संघटनेतर्फे उद्या शिवरायांचा पंचामृताने अभिषेक
आमदार अनुपभैय्यांच्या उपस्थितीत
शिवराज्याभिषेक दिन होणार साजरा

धुळे जिल्हा

छावा संघटनेच्या वतीने उद्या दि. ६ जून रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता आ.अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पंच अमृताने अभिषेक केला जाईल. असे छावाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम यांनी सांगितले.

६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक साजरा करण्यात आला होता, मुघल सलतनीच्या राजवटीतून मुक्त होऊन औपचारिकपने मराठा साम्राज्याची स्थापना करण्यात आली होती, म्हणूनच या दिवसाला अतिशय महत्व आहे. ह्याच दिवसाचे औचित्य साधत प्रत्येक वर्षी धुळे शहरात देखील छावा संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहाने साजरी करण्यात येत असतो.

या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन ६ जून २०२५ रोजी श्रीराम पेट्रोल पंप समोरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास धुळे शहराचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते पंच अमृताने अभिषेक करून साजरा करण्यात येणार आहे, तरी तमाम शिवप्रेमी व शंभू प्रेमींनी उद्या दिनांक ६/६/२५ रोजी सकाळी ८:३० वाजेला या ठिकाणी येऊन या उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन नानासाहेब कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *