धुळे जिल्हा
भाग्यश्री विसपुते जिल्हाधिकारी धुळे तसेच शरद मंडलिक प्रांत अधिकारी शिरपूर यांच्या तसेच तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाने शिरपूर तालुक्यात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार शिरपूर तालुक्यात ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आलेले आहेत त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन यांचे कर्मचारी देखील नेमणूक करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आज दिनांक 3/6/25 रोजी वरुड नाल्यातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे जळोद शिवारात पथकास आढळून आले त्यानुसार तहसीलदार महेंद्र माळी यांच्या निर्देशानुसार पथक जळोद शिवारात दाखल झाले सदरचे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे रवींद्र ओंकार गिरासे यांच्या मालकीचे असून सदरचे ट्रॅक्टर हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलेले आहे.
सदर कारवाईच्या वेळेस नायब तहसीलदार साळुंखे, मंडळ अधिकारी बागुल, ई बी मस्के तलाठी भटाने,अहिरे तलाठी, ठाकरे नवे भामपुर तलाठी, पाटील तलाठी जवखेडा, बाविस्कर तलाठी मांडळ, बोरसे तलाठी करवंद, हे सर्व कर्मचारी पथकात सामील होते.
तसेच यापुढे देखील माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या निर्देशानुसार शिरपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.