पुणे येथे उद्या महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी शिरपुरात व्यवस्था
आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार
शिरपूर
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम उद्या दिनांक 3 जून 2025 रोजी केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्री महोदयांच्या हस्ते पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दिनांक 3 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजता आर. सी. पटेल एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज येथील एस. एम. पटेल मेमोरियल हॉल ,करवंद नाका येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील कार्यक्रमास आमदार श्री काशीराम पावरा हे देखील उपस्थित राहणार आहेत.
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे .या योजनेअंतर्गत लाभार्थी मिळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन 3 जून 2025 रोजी मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमामध्ये ग्रामीण गृह निर्माण योजनेतील घरकुल पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात चावी वाटप व महाआवास अभियान पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास कृषी व किसान कल्याण मंत्री उपस्थित राहणार आहे. त्यासोबतच मा. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आणि इतर मान्यवर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहे.
सदर राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दिनांक 3 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजता आर सी पटेल एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज येथील एस एम पटेल मेमोरियल हॉल करवंद नाका येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील कार्यक्रमास आमदार श्री काशीराम पावरा हे देखील उपस्थित राहणार आहेत. एस एम पटेल सभागृह फार्मसी काॅलेज शिरपूर येथे 500 लाभार्थ्याच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याच्या व्यवस्थेसह आयोजन केलेले आहे. यावेळी ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील घरकुल पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते चावी वाटप करण्यात येईल.
सदर कार्यक्रमास तालुक्यातील सन्मा. आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार , सन्माननिय लोक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील मुख्य कार्यक्रमामधील मान्यवर उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. या करीता NIC web link उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उपस्थित लाभार्थ्यांना आवास मित्र ॲपचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास उपस्थित लाभार्थीची स्वाक्षरीसह नोंद करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यक्रम दरम्यान लाभार्थ्यांना अल्पोपाहार, चहा, व पाणी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती शिरपूरचे गटविकास अधिकारी श्री प्रदीप पवार यांनी दिली.