नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा अमृतस्नानाच्या तारखा जाहीर

नाशिकचा कुंभमेळा ऐतिहासिक ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 


नाशिक

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी कुंभमेळ्याच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत.

पुढील वर्षी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी सिंहस्थाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये प्रथम अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार आहे तर द्वितीय अमृतस्नान ३१ ऑगस्ट २०२७ आणि तृतीय स्नान ११ सप्टेंबर २०२७ रोजी होणार आहे. त्रंबकेश्वर येथेही ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण होणार असून पहिलं अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ द्वितीय ३१ ऑगस्ट २०२७ आणि तृतीय स्नान १२ सप्टेंबर २०२७ रोजी होणार आहे. दरम्यान, नाशिक मध्ये होणारा कुंभमेळा ऐतिहास स्वरूपाचा असेल त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कामांपैकी आराखड्या पैकी ४ हजार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा मागविण्यात आल्या आहे तर दोन हजार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत आहे. निविदा मागवून प्रक्रियेत असलेली कामे जानेवारी महिन्यापर्यँत पूर्ण होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सर्व साधु महंतांचे सहकार्य लाभत आहे आखाडा परिषद कुंभमेळ्याचे संचालन करत असते त्यामुळे कुंभमेळ्यासाठी कोणत्याही प्रकारे नीधीची कमतरता जाणवू दिली जाणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात एक्सलन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप ही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *