महापालिकेच्या घंटागाडीसह ट्रॅक्टरवरील कामगारांनी पुकारला संप

धुळे शहर

महानगर पालिकेच्या घंटागाडी व ट्रॅक्टरवर काम करणा-या कामगारांनी किमान वेतनासह इतर सुविधा त्वरीत लागु करावी या मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

संप सुरू करण्यापूर्वी एक जुन २०२५ पासुन सर्व कामगार कुटुंबीयांसह महापालिकेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा ईशारा धुळे महानगर पालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनास लेखी निवेदनातून दिला आहे.

संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की धुळे महानगर पालिकेतील घंटागाडीवर व ट्रक्टरवर काम करणारे सर्व कामगार धुळे महानगरपालिका कामगार-कार्मचारी संघटनेचे सभासद आहेत. या कामगारांना किमान वेतन लागु करावे अशी मागणी करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत किमान वेतन देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परंतु ट्रॅक्टरवर काम करणा-या कामगारांना मात्र अद्यापही किमान वेतन लागु केलेले नाही.

हे कृत्य कामगारांमध्ये भेदभाव करून कामगार कायद्याचे उल्लंघन करणारे आहे.सर्व कामगारांना दरमहा सात तारखेच्याआत वेतन अदा करणे बंधनकारक असुनही वेळेवर वेतन अदा केले. जात नाही.सर्व कामगारांना पी.एफ., ई.एस.आय.सी, कायदेशिर रजा, गणवेश, हॅण्डग्लोज व गणबुट आदी साहित्य-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि  ट्रॅक्टरवर काम करणा-या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा त्वरीत लागु कराव्यात या मागणीसाठी आजपासुन सर्व कामगार त्यांच्या कुटुंबीयांसह महापालिका कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनावर सेक्रेटरी कॉ.रमेश जगताप,कॉ. शंकार जाधव, कॉ मिन्दार्थ देवरे,आकाश दामोदर, सनी पवार,वाल्मीक राजु जाधव,योगेश पाथरे,राहुल लोंढे आदी अनेक पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *