पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशाब्दी जयंती निमित्त धुळे शहरात विविध कार्यक्रम

धुळे जिल्हा

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आज धुळे शहर तसेच जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अभिवादन करण्यात आले. सकाळी मिल परिसरातून धुळे शहरातून धनगर समाज युवकानी मोटरसायकल रॅली काढली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीर आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला.


त्रिशताब्दी जयंती वर्षा निमीत्त २१ मे ते ३१ मे दरम्यान विवीध धार्मीक कार्यक्रमांचे धुळे महानगरात भव्य स्वरुपात आयोजन करण्यात आले. ज्यात प्रामुख्याने शहरात स्थित असलेले, विवीध पुरातन मंदिरांची आणि घाटांची साफ-सफाई करून, महाआरती घेण्यात आली. त्याच प्रमाणे धुळे शहरातील सार्वजानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समाजातील अनेक नागरिक बंधु भगिणींना सदर स्तुत्य उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. तसेच धुळे शहरातील सर्व भाजप मंडलात रक्तदान शिबीरासह राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जिवनावर आधारीत व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमा प्रसंगी भारतीय जनता पार्टी, धुळे महानगराचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर, माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा सहकारी बँकेचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, डॉ. सुशिलकुमार महाजन, ज्येष्ठ नेते रवीजी बेलपाठक, माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *