धुळे जिल्हा
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरतीकरीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने नियोजन 27 ते 30 मे, 2025 व दि. 2 ते 5 जून, 2025 या कालावधीत करण्यात आलेले आहे.
त्यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पूणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.