लेखापरीक्षणाने केला गैरप्रकारांचा पर्दाफाश
तत्कालीन कर्ज अधिकारी, अकौंटंट आणि वसुली अधिकाऱ्यांवर अपहाराचा ठपका
धुळे जिल्हा
शिरपूर मर्चटस को ऑप बँकेचे तत्कालीन कर्ज अधिकारी, अकौंटंट आणि वसुली अधिकाऱ्यांसह तब्बल ४९ जणांविरुद्ध घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता बँकेचे सभासद व ठेवीदार यांचा १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सनदी लेखापाल अजय नंदलाल राठी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, दि.शिरपूर मर्चटस को ऑप बँक लि शिरपूर जि धुळे या बँकेच्या लेखा परिक्षणासाठी राठी यांची वैधानिक लेखा परिक्षणाचे नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कामाकाज सुरु केले. त्यादरम्यान बँकेतर्फे वाटप करण्यात आलेली कर्ज प्रकरणांची माहिती घेतली असता त्यांना अनेक कर्ज वाटपात अनियमितपणा , गैरप्रकार आढळून आले. त्याची तपासणी केली असता या संशयस्पद प्रकरणातील एक कर्जप्रकरण हर्षद जयराज जैन रा. शिरपूर हे बँकेचे तात्कालीन अध्यक्ष प्रसन्ना जयराज जैन रा. शिरपूर यांचे सख्खे बंधू आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे संचालकांनी त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देणे प्रतिबंधित असतांना देखील प्रसन्ना जयराज जैन यांनी बँकेचे व्यवस्थापक संजय केशवराव कुलकर्णी रा.(ता. शिरपूर) यांच्यासोबत संगनमत करुन हर्षल जयराज जैन यांना विनातारण कर्ज दिले असल्याचे दिसून आले. सन २०२३-२४ मधील एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील वैधानिक लेखा परिक्षण करतांना हा प्रकार उघड झाला. यानंतर अजय नंदलाल राठी यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादी नुसार इतेश हसमुखलाल जैन, एकनाथ बालकिसन भंडारी, केतनकुमार जयराज जैन,श्रीराम अशोक विठोबा, जैन शांतीलाल दगडुलाल,तेली खुदाबक्ष शेख चर्चाद,अग्रवाल दिलीपकुमार राधेश्याम, भागवत गिरीजा गिरीष,भागवत गिरीष सिध्दनाथ, अग्रवाल गाविदलाल मदनलाल,धाकड प्रमोद गजानन, जैन ईतेश हसमुखलाल,अग्रवाल भगवान बाबुलाल, शेख खतिब अजिज, जैन जतीन किरण,शाह संगिता अविनाश, शाह सचिन विनेंद्र,शेख कामील अहमद शेख नजीर, अहिरे सुरेश तुळशीराम,जैन अमोल कांतीलाल, चौधरी भुषण अरुण, पटेल चंचालाल हिरालाल,कमलानी रमेश हुरालालदेशमुख प्रविण चंद्रसिंग,जैन हर्षद जयराज, अग्रवाल रामेश्वर घासिलाल, गिरासे जितेंद्र शांताराम,जयस्वाल रितेश सुरेश,माळी नितीन लक्ष्मण, दलाल भगवान रामकृष्ण,गुजराती सुरेशलाल छगनलाल, जया किरणचंद जैन,अमरदीप रमेश सिसोदिया, प्रकाश महारु चौधरी, रविंद्र महारु चौधरी,जतीन किरणचंद जैन,दिलीप एकनाथ धाकड,मंगलसिंग कुंदनसिंग जाधव, राजेंद्र नंदलाल अरुजा, सौरव राजेंद्र भंडारी,जयपाल विजयसिंग गिरासे,निखील अशोक अग्रवाल, निमराज शामदास चौधरी व सिध्दार्थ प्रकाश थोरात सर्व रा.शिरपूर (जि.धुळे) या कर्जदारांनी बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. परंतु या कर्जाची मुदतीत परतफेड केली नाही. बहुतेकांनी तर कर्ज ज्या व्यवसायासाठी घेतले होते तो व्यवसाय केला नाही आणि कर्जाची रक्कम दुसरीकडेच वळविली असल्याची शक्यता आहे. एवढेच काय तर कर्ज घेतांना विनातारण कर्ज घेतले.
मधल्या काळात बँकेच्या व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी अनेक कर्जप्रकरणे तारणी झालेली आहेत अथवा कर्जाची परतफेड झालेली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाच्या मास्टरर्स सर्क्युलर ऑन विलफुल डिफॉल्टर नुसार थकबाकीदार कर्जदारांनी बँकेचे अध्यक्ष प्रसन्ना जयराज जैन, व्यवस्थापक संजय केशवराव कुलकर्णी, महेश पंडितलाल गुजराथी, दिलीप बाळकृष्ण कापडी सर्व रा शिरपूर जि धुळे तसेच तत्कालीन कर्ज अधिकारी, अकौंटंट, वसुली अधिकारी यांनी बँकेशी संगनमत करुन विनातारणी आय बी पी कर्ज, हायपोथिकेशन कर्ज, कोल्ड स्टोरेज लोन असे कर्ज घेऊन त्या कर्जाची नियमाप्रमाणे परतफेड न करता बँक सभासद व ठेवीदार यांचा विश्वासघात केला.
यातून बँकेच्या सभासद व ठेवीदारांची १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांची फसवणुक झाली. या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.