शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे 27 मे पासून आयोजन

 

धुळे जिल्हा

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. असे अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पूणे यांनी कळविले आहे.

सदर परीक्षेचे आयोजन 24 मे, 2025 ते 5 जून, 2025 या कालावधीत प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल असे 25 एप्रिल, 2025 च्या अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार आता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षा घेण्याचे नियोजन 27 ते 30 मे व 2 ते 5 जून, 2025 या कालावधीत करण्यात आलेले आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांना देण्यात येतील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वेळोवेळी दिलेल्या, प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेतील सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे. असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *