” लोकवृत्त कटाक्ष “
निर्जीव कुलूप ‘१०२’ चे पटापटा बोलले,
समितीचे खरे ‘राज’ त्यानेच तर खोलले!
नाहीत निघाले पाच कोटी, म्हणून काय झालं,
निदान दोन कोटीने तरी ‘गुलमोहर’ न्हालं!!
दरवेळी थोडीच असतो, प्रश्न खऱ्या-खोट्याचा,
कधीतरी प्रहार होतो टणक दगड-गोट्याचा!!
दूध का दूध नि पाणी का पाणी,
खरंच इथे होईल का, दोषी कोण
तो खरा-खोटा तुरुंगात जाईल का!!