धुळे शहरातील अवैध धंदे बंद करा -राष्ट्रवादीची मागणी

धुळे शहर अवैद्य धंद्यांची राजधानी बनल्याचा आरोप करत पोलिस अधीक्षक धिवरे यांना निवेदन सादर

धुळे शहर

धुळे शहरातील दोन नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे, अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली आहे. आज निवेदन सादर करीत निदर्शने करण्यात आली.


निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरांमध्ये दोन नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. अवैध दोन नंबर धंद्यामुळे शहरातील वातावरण खराब होत आहे. धुळे शहरातील तणाव, मारामाऱ्या,खून,दरोडे,चोऱ्या यांच्या कारण मुख्यतः म्हणजे धुळे शहरात चालणारे दोन नंबरचे अवैध धंदे आहेत. आज धुळे शहरांमध्ये विविध प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा, सट्टापेढी, मटका, चक्री, अवैद्य गॅस,गांजा, कोरेक्स बॉटल, सोरट,गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार अवैध जनावर वाहतूक, वाळू तस्करी, डुबलीकेट डांबर, केमिकल, टायगर, काला पिला, अवैद्य जनावरे वाहतूक, फोर पीस, चोरी व विमा च्या गाड्यांचे स्क्रबिंग अशा विविध स्वरूपाचे दोन नंबरचे अवैध धंदे धुळे शहरांमध्ये सुरू आहेत. आमच्या माहितीनुसार धुळे शहरांमध्ये जवळपास विविध प्रकारचे 380 ठिकाणी दोन नंबरचे अवैध धंदे सुरू आहे. काही ठिकाणच्या दोन नंबर व अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळालेले आहे. पोलीस विभागातील काही अधिकारी, कर्मचारी या अवैध धंद्यांना पाठबळ देत आहे. यामुळे धुळे शहराचे वातावरण कुलुशीत झालेले आहे. गोरगरीब, कष्टकरी जनतेकडून अवैद्य धंद्यांच्या मार्फत करोड रुपये कमवून काही अधिकारी, कर्मचारी गब्बर झाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरांमध्ये गुंडगिरी, दादागिरी, चौकाचौकात टपोरी गुंड यांचे प्रमाण वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चॅपर, फायटर, बेकायदेशीर हत्यार दिसून येते. त्यांना कोणाचे भय राहिलेले नाही.धुळ्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडे हत्यारे दिसून येतात, ही धोकादायक बाब आहे.

या दोन नंबरच्या अवैद्य धंद्यांना जनता कंटाळली आहे. या प्रकारांमुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घाबरत आहेत. धुळे शहराचा विकास खुंटलेला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार अवैद्य धंदे आहेत.
तरी पोलीस प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करून धुळे शहरातील अवैद्य दोन नंबरचे धंदे त्वरित बंद करावे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चॅपर,फायटर, बेकायदेशीर हत्यारे जमा करावीत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष याविरुद्ध मोठ्या स्वरूपांत तीव्र आंदोलन सुरू करेल. याची नोंद घ्यावी. असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, शशी नाना भदाणे, जोसेफ मलबारी,यशवंत पाटील, दीपक देवरे, शकीला बक्ष, भीका नेरकर, जगन ताकटे, जितू पाटील, अमीन शेख, बंटी वाघ, बरकत शाह, ज्ञानेश्वर पाटील, डी.टी. पाटील, राजू मशाल, मंगलदास वाघ, समद शेख, मनोहर निकम,सुनील अहिरे, वाल्मीक मराठे, निखिल मोमया, रामेश्वर साबरे, भटू पाटील, युनूस शेख, युसुफ शेख, वैभव पाटील, राजू चौधरी,निखिल वाघ, कल्पेश मगर, सागर चौगुले, राजेश तिवारी, अशोक गवळे,संजय मेतकर, स्वामिनी पारखे, शेख हूजेर, किसन ठाकरे, शेख सफिक, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *