शिरपूर तालुक्यात घरकुल लाभार्थीना 5 ब्रास वाळू वाहतूक पासेसचे घरपोच वाटप

 

धुळे जिल्हा

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक : ३० एप्रिल,२०२५ नुसार तसेच वाळ्र निर्गती धोरण-२०२५ दिनांक ०८.०४.२०२५ च्या शासन निर्णयान्बये घरकुल लाभार्थी यांना वाळू उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत त्यामध्ये वाळूच्या स्थानिक वापरासाठी व इतर वापरासाठी काही तरतूदी विषद केलेल्या आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शासकीय घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू वाहतुकीचे पासेस घरपोच वाटप करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

घरकूल लाभार्थयाना वाळूचा पुरवठा होण्यामध्ये येणाऱ्या अडचणीचा विचार करुन ग्रामपंचायत हद्दीमधील वाळस्थळातून वाळ उत्खननाकरिता केद्र शासनाच्या पर्यावरण , वन व वातावरणोय बदल मंत्रालय (भारत सरकार) यांचेकडील दि.२८ मार्च,2020 च्या अधिस्चनेतील APPENDIX-IX मधील अनुक्रमांक ४च्या तरतुदीनुसार निश्चित केलेले वाळू गट तसेच पयंवरण अनुमतोप्रप्त वाळू गटापैकी जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा वाळू गटांमधील वाळू घरकूल लाभार्थीं व इतर स्थानिक वापरासाठी उपलब्ध करुन देण्याकरीता शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिरपूर तालुक्यातील 5 गावातील गट विकास अधिकारी यांचेकडून यादी प्राप्त झालेले घरकुल लाभार्थी यांना ऑफलाईन पासेस चे वितरण सुरु करण्यात आले आहे.
करवंद 184
मांडल 81
ऊपर पिंड 64
खामखेडा प्र था 73
लोंढरे 260
असे एकूण 662 लाभार्थी यांना संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक हे 5 ब्रास वाळू वाहतूक पासेस घरपोच लाभार्थी यांना वितरण सुरु करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *