धुळे जिल्हा
सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तां.) धुळे कार्यालयामार्फत कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये जिल्ह्यातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा या योजनेच्या ४८ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत (PMSSY) येणाऱ्या बायोफ्लॉक, रास, पिंजरा संवर्धन आदी योजनांबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. या व्यतिरिक्त ई- श्रम कार्ड योजना, अपघात गट विमा योजना, किसान क्रेडीट कार्ड तसेच नव्याने लागू झालेली NFDP अंतर्गत मच्छीमारांची नोंदणी व विभागाच्या इतर योजनांबाबत माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण शिबीरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना विभागामार्फत प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या शिबीरात जयेश बळकटे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, संतोष देसाई, मत्स्यव्यवससाय विकास अधिकारी, अविनाश गायकवाड, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री. देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000000