आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली देशभक्तिपर वातावरणात तिरंगा ध्वज यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे जिल्हा
ऑपरेशन सिंदूर यशस्वी करीत पाकिस्तानला धडा शिकवणार्या भारतीय जवानांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी, सारे भारतवासीय जवानांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यासाठी आज धुळे शहरातून १ हजार १११ फुटांचा तिरंगा ध्वज हाती धरत भव्य अशी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या तिरंगा ध्वज यात्रेला धुळेकर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय जवानांच्या शौर्याला अभूतपूर्व सलाम केला. या पदयात्रेमुळे धुळे शहरात देशभक्तिपर वातावरण निर्माण झाले.
धुळे शहरातील अग्रसेन महाराज स्मारकापासून या तिरंगा पदयात्रेला सुरुवात झाली. डीजेच्या तालावर देशभक्तिपर गीतांची रेलचेल, सोबत पोलिस बँड पथकाकडून वाजविल्या जाणार्या गीतांमुळे अभूतपूर्व देशभक्तिपर वातावरण निर्माण झाले होते. सर्वांत पुढे माजी सैनिकांसोबत आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि त्यांच्या मागे ११११ फुटांचा ध्वज हाती धरत सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. अग्रसेन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आग्रा रोडने पाचकंदील, जमनालाल बजाज रोड चौक, श्रीराम धाम चौक, फुलवाला चौकमार्गे ही पदयात्रा महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पोहोचली. या पदयात्रेत विविध क्षेत्रांतील महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात अनेकांनी पाकिस्तान का पूर्ण संहार-देश की अब है एक पुकार, ऑपरेशन सिंदूर-पराक्रम अभूतपूर्व, सेना के सन्मान में हम सब है मैदान में, सिंदूर के सन्मान में- भारत है मैदान में, हमारा बल हमारा मान-सेना का हर एक जवान आदी फलक हाती धरत भारतीय जवानांच्या कार्याला सलाम करण्यात आला. अग्रसेन चौक ते महात्मा गांधी पुतळादरम्यान सुमारे एक तास चाललेल्या या तिरंगा ध्वज यात्रेतून सारे धुळेकर भारतीय सैन्याच्या आणि पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यात आला.
तिरंगा ध्वज यात्रेचा शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ समारोप झाला. तेथे आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते माजी सैनिकांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
यामध्ये जिल्हा सैनिक अधिकारी मेजर निलेश पाटील, माजी सैनिक शासकीय संघटनेचे धुळे-नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजूलाल चौधरी, एस सिद्धी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भीमराव बोरसे, संतोष चौधरी, गुलाब पाटील, मधुकर पाटील, भगवान बोरसे, जगन्नाथ सूर्यवंशी, सुनील बडगुजर, मनोज पाटील, संजय रणदिवे, रविकांत खंडारे, रोहिदास बैसाणे, रामचंद्र जाधव, भदंत मोरे, देविदास कुलकर्णी, सुनील पाटील, चिंतामण पाटील, गोरख मंगळे, हिंमत माळी आदी जवानांना गौरविण्यात आले.
यानंतर पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी भारतीय तिरंगा ध्वजाला सलामी दिली. यानंतर महाराष्ट्र गीताने तिरंगा ध्वज यात्रेचा समारोप झाला.
या तिरंगा ध्वज पदयात्रेत भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी बेलपाठक, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव, अल्पा अग्रवाल, प्रतिभा चौधरी, मायादेवी परदेशी, प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, जिल्हा महामंत्री जितेंद्र शहा, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, सुनील बैसाणे, संदीप बैसाणे, पृथ्वीराज पाटील, आकाश परदेशी, संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, हेमंत मराठे, प्रथमेश गांधी, पंकज धात्रक, पवन जाजू, ज्ञानेश्वर पाटील, अमोल मासुळे, विकी परदेशी, रोहित चांदोडे, भिकन वराडे, प्रशांत बागूल, योगिता बागूल, किरणताई कुलेवार, भारती माळी, ऊर्मिला पाटील, आरती पवार, अरुण पवार, विजय पवार, मोहिनी गौड, शशी मोगलाईकर, अजय अग्रवाल, राजेश पवार, दगडू बागूल, नंदू सोनार, कैलास चौधरी, पप्पू डापसे, विनय बेहेरे, सुबोध पाटील, कमलाकर पाटील, हिरालाल मोरे, प्रकाश पोळ, प्रकाश उबाळे, बबन चौधरी, सुहास अंपळकर, सागर कोडगिर, बंटी धात्रक, अनिल थोरात, छोटू थोरात, किशोर जाधव, अमोल सूर्यवंशी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळेकर जनतेचे अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आभार – आ.अनुप अग्रवाल
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर जो भ्याड हल्ला केला होता त्याला प्रत्युतर म्हणून भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबविले. यात भारतीय जवानांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे तसेच त्यांचे हवाई तळ पूर्णतः उद्ध्वस्त करत पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली. यात भारतीय जवानांनी जे शौर्य दाखविले, जो भीम पराक्रम केला त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी, आपण सारे भारतीय त्यांच्या सोबत आहोत, हा संदेश देण्यासाठी आज शहरात तिरंगा ध्वज यात्रा काढण्यात आली. यात शासकीय अधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वधर्मीय धुळेकर जनतेने जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. असे आमदार अनुप अग्रवाल रॅली समारोप प्रसंगी म्हणाले.