आ. काशिराम पावरा, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष बापु खलाणे यांच्या नेतृत्त्वात रॅली संपन्न
धुळे जिल्हा
पराक्रमी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ, त्यांना मानवंदना देण्यासाठी आज दि. १९ मे रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात आ. काशिराम पावरा, धुळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बापु खलाणे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व शिरपुरकरांनी एकजूट दाखवत शौर्यवंदना तिरंगा रॅली काढली.
’छत्रपती शिवाजी महाराज की जय..भारत माता की जय..वंदे मातरम..जय जवान जय किसान..’ अशा घोषणाबाजीत शहरातील पातेश्वर चौकातील क्रांती स्मारकवर पुष्पचक्र वाहून सांगता झाली. शिरपुर बाजार समिती येथे सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळ्यास पूष्पहार वाहून वंदन करुन या रलीस प्रारंभ झाला. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीत वाजविले.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. काशिराम पावरा म्हणाले, तिरंगा रॅलीच्या निमित्ताने सगळ्या शिरपुरकरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. ही रॅली शिरपुरकरांची आणि राष्ट्र प्रेमाची आहे, हे सगळ्यांनी मिळून दाखवून दिले आहे.
शिरपूर शहरातील पाताळेश्वर चौकात क्रांती स्मारक येथे राष्ट्रगीताने आणि आ. काशिराम पावरा, धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बापु खलाणे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून रॅलीची सांगता झाली.