धुळे जिल्हा
धुळे शहरात स्वतंत्र आयुष हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. १५ कोटीचा निधी यासाठी उपलब्ध झाला आहे, लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी माहिती देत जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांसह खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी आज शहरातील नदी किनारच्या गणपती मंदिरामागिल ३२ कॉंर्टर निवासस्थान येथील नियोजित आयुष हॉस्पिटलच्या जागेची पाहणी केली.
धुळे शहरात आयुष हॉस्पिटल मंजूर केले असून तसे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी दिले आहेत. देशपातळीवर आयुष आरोग्य सेवा क्षेत्रात क्षमता वाढवणे आणि विकसित करणे हा आयुष आरोग्य या योजनेचा उद्देश असून याच अनुषंगाने राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत अधिकाधिक उत्तम आणि दर्जेदार सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी सन २०२५-२०२६ राज्य वार्षिक कृती आराखडयामध्ये किमान १० आयुष हॉस्पिटल बांधणे कामी धुळे जिल्हयाला देखील संदर्भीय बैठकीत सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाचे केंद्रीय मंत्री यांनी आदेशित केले आहे. त्यात धुळे जिल्हयातील धुळे शहराचा देखील समावेश आहे. याबाबत धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी यासाठी दिल्ली येथे संसद भवनात मागणी केली होती त्याला मोठे यश मिळाले असून धुळे शहरात ५० बेडचे सुमारे १५ कोटी रुपयांचे आयुष हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.
धुळे शहरालगत आयुष हॉस्पिटल बांधण्यासाठी ग्राम विकास किंवा आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने त्यांच्या स्तरावरून जागा उपलब्ध करून दयावी या अनुषंगाने आज ३२ कॉंर्टर निवासस्थान, गणपती मंदिर मागे, लहान पुलाजवळ खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांच्यासह श्री.भा.हि.शा.वै. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांच्या उपस्थितीत पाहणी केली.
या आयुष हॉस्पिटलच्या जागा पाहणी दौर्या प्रसंगी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कॉंग्रेसचे युवराज करनकाळ, रमेश अण्णा श्रीखंडे, पितांबर महाले, माजी विरोधी पक्ष नेते हाजी साबीर शेठ, हाजी ईस्माइल पठाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रणजीतराजे भोसले, डॉ. दरबारसिंग गिरासे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पाटील, भिवसन अहिरे, सुनील शिंदे, डॉ. दिनेश बच्छाव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.