धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बापु खलाणे यांचा भाजपा नेत्यांनी केला सत्कार

 

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात भाजपामध्ये १९८८ पासुन सक्रीय काम करणारे, भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते, कापडण्याचे रामकृष्ण उर्फ बापु खलाणे यांची धुळे भाजपा ग्रामिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीयमंत्री डाॅ. सुभाष भामरे, धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित बापु खलाणे यांचा धुळे येथे भाजपा तर्फे सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, धुळे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे शिरपुर भाजपा ग्रामिण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरुपाल राजपुत, शिंदखेडा ग्रामिण मंडळ अध्यक्ष मोतीलाल वाकडे, शिंदखेडा शहर मंडळ अध्यक्ष संजय महाजन, धुळे मंडळ अध्यक्ष प्रा. रविंद्र निकम, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष विक्की कोकणी, जिल्हा चिटणीस प्रमोद गांगुर्डे, मोतीलाल पोतदार, सौ. सुवर्णा अजगे, शंकरराव खलाणे आदि उपस्थित होते.

पक्ष संघटनेचे, जनसेवेचे उत्कृष्ट कार्य आपल्या हातून सत्ता आणि संघटन यामध्ये उत्कृष्ट समन्वय साधून कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा व सदिच्छा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा पदाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *