कान्हदेश वारकरी सेवामंडळाच्या रौप्यमहोत्सवानिमित्ताने
धुळे शहरात अखंड हरीनाम सप्ताह आणि पुरस्कार सोहळा
धुळे जिल्हा
कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने धुळ्यात उद्या दि. १७ मे पासून अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या संकिर्तन सप्ताहाच्या सांगता सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच रविवार दि.२५ रोजी कान्हदेश वारकरी रत्न आणि वारकरी भूषण पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार आणि राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. अशी माहिती रौप्य महोत्सवी किर्तन सप्ताह समितीचे अध्यक्ष तथा धुळ्याचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आ.अनुप अग्रवाल म्हणाले की, धुळे,जळगाव,नंदुरबार,नाशिक या भागाला खान्देश संबोेधले जाते. मुळात हा खान्देश नसून कान्हादेश आहे. त्यामुळे खान्देश ऐवजी कान्हदेश नामकरणासाठी विधानसभेत आवाज उठविणार आहे.
या पत्रकार परिषदेत आ.अनुप अग्रवाल आणि सुनिल वाघ यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. कान्देश वारकरी सेवा मंडळाच्या ग्रंथराज ज्ञानेेश्वरी पारायण, रौप्य महोत्सवानिमित्ताने उद्या शनिवार दि.१७ ते रविवार दि.२५ या सात दिवसात धुळ्यातील कॉटन मार्केटच्या मागे, प्रीती सुधाजी हायस्कूलजवळ असलेल्या प्रसन्न हनुमान मंदिर पवन नगर येथे अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे.
किर्तन सप्ताहात शनिवारी ह.भ.प. सुदर्शन महाराज गायकवाड (गोंदूर) त्यानंतर रविवारी ह.भ.प.महंत आनंददासजी महाराज (कजवाडेकर), सोमवार ह.भ.प.अमृताश्रम स्वामी महाराज (राजुरी बीड),मंगळवार ह.भ.प.पद्माकर महाराज देशमुख (अमरावती), बुधवार ह.भ.प.सुनिलजी महाराज झांबरे (आष्टी), गुरुवार ह.भ.प.महादेव महाराज राऊत (बीड),शुक्रवार ह.भ.प.गुरुवर्य मुकूंदकाका महाराज (जाटदेवळेकर), शनिवारी ह.भ.प.दिनानाथ महाराज सावंत (नामपूर) यांचे काल्याचे किर्तन होईल. रोजरात्री ८ ते १० या वेळात हा किर्तन सोहळा रंगणार आहे. किर्तनाला शिरपूर,नंदुरबार, धुळे, शिंदखेडा,शहादा, नंदुरबार,तळोदा, साक्री तालुक्यातील आणि धुळे शहरातील भजनी मंडळी साथ संगत करणार आहे. किर्तन सोहळा सुरु होण्यापूर्वी संध्याकाळी ६ ते ७ या वेळात हरीपाठ होईल. पत्रकार परिषदेत संकिर्तन सोहळ्यासाठी जनजागृतीपर माहिती पत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले.