कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या नियंत्रणातील धुळे
कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

धुळे जिल्हा

महात्मा फ़ुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या प्रशासकीय नियंत्रणात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटीतपणे आंदोलन करीत काम बंद आंदोलन केले आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयातील कृषी विज्ञान केंद्राबाहेर आज एकत्र येत कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी काम बंद सुरु करीत निदर्शने केली.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले धुळे, मुंबराबाद फार्म -जळगाव, बोरगाव – सातारा, मोहोळ – सोलापुर येथील कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सुध्दा आज काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. अशी माहिती यावेळी समन्वयक डॉ. दिनेश रावसाहेब नांद्रे यांनी दिली.

कृषि विज्ञान केंद्रातील आस्थापनेवरील सर्व पदे मंजुर असुन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नेमणुका या, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३ अंतर्गत, सर्व निकष पुर्ण, विहित कलम – उपकलंम यामधील आदर्श नियमावलीचा अवलंब करुन करण्यात आलेल्या आहेत. सामंजस्य करार कलम ७ र्(ींळ) नुसार कृषि विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना विद्यापीठ कर्मचार्‍यांप्रमाणे लाभ देण्यात यावेत अशी सहमती झालेली आहे. या सहमतीकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे सर्वोच्च प्रमुख महासंचालक यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे.असे असले तरी, विद्यापीठ प्रशासन या पूर्ण प्रक्रियेकडे आपली जबाबदारी झटकत असल्याचे कर्मचार्‍यांनी संबंधीत विभागाच्या वरीष्ठांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

धुळ्यात आज कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी आंदोलनात कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश रावसाहेब नांदे्र, डॉ. पंकज प्रकाश पाटील, रोहित विजयराव कडू, जगदिश काथेपुरी, श्रीमती अमिता अशोक राऊत, डॉ, अतिश पाटील, डॉ.धनराज चौधरी, प्राची काळे, स्वप्नाली कौटे, जयराम गावित, स्वप्नील महाजन, बाळू वाघ, रमेश शिंदे, कुमार भोये, मधुसुदन अहिरे आदी सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *