कृषी यांत्रिकीकरण योजनेत धुळे जिल्ह्यातील 307 लाभार्थ्यांना 2 कोटी 90 लाख अनुदानाचे वाटप

कृषी यांत्रिकीकरण योजनेत धुळे जिल्ह्यातील 307 लाभार्थ्यांना 2 कोटी 90 लाख अनुदानाचे वाटप

शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

धुळे जिल्हा

कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यात सन 2024-2025 या आर्थिक वर्षांत 307 लाभार्थी शेतकऱ्यांना 2 कोटी 89 लक्ष 94 हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत औजारे घटकात 45 लाभार्थ्यांना 23.30 लक्ष अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात धुळे तालुक्यातील 7, साक्री 19, शिरपूर 12 तर शिंदखेडा तालुक्यातील 7 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत ट्रॅक्टर/औजारे घटकात 170 लाभार्थ्यांना 181.77 लक्ष अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात धुळे तालुक्यातील 26, साक्री 54, शिरपूर 42 तर शिंदखेडा तालुक्यातील 48 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतंर्गत ट्रॅक्टर/औजारे घटकात 92 लाभार्थ्यांना 84.87 लक्ष अनुदानाचे वाटप करण्यात आले. यात धुळे तालुक्यातील 23, साक्री 31, शिरपूर 21 तर शिंदखेडा तालुक्यातील 17 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सन 2025-2026 वर्षांत राष्ट्रीय कृषि विकास योजनेत 1 कोटी 92 लाख 50 हजार, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेत 5 कोटी 30 लाख तसेच कृषि यांत्रिकीकरण उपअभियानात 6 कोटी असे एकूण 13 कोटी 22 लाख 50 हजार रुपयांचा प्रस्तावित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

यांत्रिकीकरण औजारे व यंत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने कमी वेळात सर्व प्रक्रिया पार पाडली जात असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *