स्टाईल गोडावूनला भिषण आग, १५ लाखाचे नुकसान

धुळे शहरातील स्टाईल गोडावूनला
भिषण आग, १५ लाखाचे नुकसान

धुळे जिल्हा

धुळे शहरातील नगाव बारी परिसरातील असलेल्या समता सिरॅमिक या बांधकाम साहित्य आणि स्टाईल विक्रीच्या गोडावूनला आज गुरुवारी सकाळी मोठी आग लागली. आगीत १५ लाख रुपयांपेक्षा पेक्षा अधिक हानी झाली आहे. पहाटे साडेसहा वाजेला ही घटना उघडकीस आली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला.

यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार समता सिरॅमिक या दुकानाची दुमजली इमारत आहे.आग भडकताच दुसर्‍या मजल्यावरील फर्निचर आगीच्या भक्षस्थानी पडले आणि थोड्याच वेळात सिरॅमिक टाइल्स, किचन सिंक,शौचकुप, बाथरूम संच आदी संपूर्ण साहित्य अवघ्या काही वेळेत जळून खाक झाले.समता सिरॅमिकचे संचालक नयन विनोद टाटिया यांचे पंधरा लाख रुपयाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन,फायरमॅन पांडुरंग पाटील, शाम कानडे, कुणाल ठाकूर, वाहन चालक राहुल पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेगवेगळ्या तीन बंबांचे सहाय्याने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यामुळे तर जीवित हानी टळली. या घटनेचा शासन स्तरावर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *