नाशिकमध्ये मॉक ड्रिल यशस्वी; अर्ध्या तासात मोहीम पत्ते

नागरिक संरक्षण दल, अग्निशमन दल, गृहरक्षक दल सहभागी

नाशिक शहर

केंद्र शासनाच्या गृह खात्याच्या निर्देशानुसार नाशिक शहरातील केटीएचएम महाविद्यालयामध्ये आज जिल्हा प्रशासन आणि विविध खात्यांच्या वतीने मॉकड्रिल करण्यात आलं.

या महाविद्यालयात विमानातून बॉम्ब हल्ला झाल्याचा निरोप जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच नागरिक संरक्षण दल, अग्निशमन दल, गृहरक्षक दल तातडीने

घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना रुग्णालयामध्ये हलवले तसेच या ठिकाणी लागलेली आगही आटोक्यात आणली अवघ्या अर्ध्या तासात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, असे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यापुढेही वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये अशाच प्रकारे मॉकड्रिल घेऊन सराव करण्यात येईल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *