धुळ्यात 10 दिवसात 5 व्हॉल तोडून पाणीपुरवठा रोखला अज्ञात समाजकंटकाविरुद्ध महापालिकडून गुन्हा दाखल

हे तर भाजपच्या बदनामीसाठी विरोधकांचे कारस्थान
भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांचा आरोप..!

धुळे शहर

धुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत करण्यासाठी मुद्दाम पाईपलाईन वरील एअर व्हॉल तोडून हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. यामुळे धुळे शहरातील पाणीपुरवठा उशिराने होत असून नागरिकांना उन्हाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान अशा पद्धतीने पाईपलाईन वरील व्हॉल तोडणाऱ्या अज्ञात समाजकंटकांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात महापालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर भारतीय जनता पक्षाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंबळकर यांनी विरोधकांवर खालच्या पातळीचे राजकारण करून भाजपला बदनाम करण्यासाठी आणि जनतेला त्रास देण्यासाठी अशा पद्धतीने पाण्याच्या पाईपलाईन फोडण्याचे कारस्थान चालवले असल्याचा आरोप करीत निशाणा साधला आहे. त्यांनी याविषयी पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांना कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे गजेंद्र शेठ यांच्या सूचनेनुसार धुळे महापालिका प्रशासनाने अशा पद्धतीने पाईपलाईन फोडणाऱ्या विरुद्ध थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची पाऊल उचलले आहे. 

धुळे महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता निलेश राजेंद्र देवरे यांनी पाईपलाईन फोडल्या बाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. यात म्हटले आहे की, धुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अक्कलपाडा धरणातुन धुळेपर्यंत पाण्याची पाईपलाईन करण्यात आलेली आहे. सदर पाईप लाईनला ठिकठिकाणी एअर व्हॉल बसवण्यात आलेले आहे. दिनांक 25. एप्रिल 2025 रोजी दुपारी 04.30 वाजेच्या सुमारास मोराणे प्र. ल. ता जि धुळे गावाजवळ नदीच्या पुलाच्या बाजुला असलेली पाण्याची पाईपलाईन वर असलेला व्हॉल क्र. 23 याला कोणीतरी अज्ञात इसमाने फोडुन नुकसान केल्याने सदर व्हॉलमधुन पाणी बाहेर निधुन वाया जाताना दिसल्याने आम्ही सदर व्हॉल दुरुस्त केला व पाण्याची गळती थांबविली. त्यानंतर दि 28 एप्रिल रोजी आणि दि. 29 रोजी तोच व्हॉल कोणीतरी अज्ञात इसमाने पुन्हा फोडुन टाकला.  सदर व्हॉल परत दुरुस्त केला आणि पाण्याची गळती मनपाने थांबविली.

त्यानंतर दि.02 मे 2025 रोजी गोंदुर स्मशानभुमी जवळ असलेल्या मुख्यजलवाहिनीवर बसविलेल्या व्हॉल क्र. 15 याला कोणीतरी अज्ञात इसमाने फोडुन नुकसान केल्याचे आढळले.  सदर व्हॉल पाणीपुरवठा विभागाने दुरुस्त केला व पाण्याची गळती थांबविली. त्यानंतर दि. 05 मे रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मोराणे प्र.ल गावाचे शिवारात विटाभट्टीजवळ महामार्गाच्या बाजुला असलेला मुख्यजलविहिनीवर बसविलेला व्हॉल क्र25 याला कोणीतरी अज्ञात इसमाने फोडुन नुकसान केल्याने सदर व्हॉलमधुन पाणी वाया गेले, सदर व्हॉल सुध्दा दुरुस्त केला व पाण्याची गळती थांबविली.  06 मे रोजी सकाळी 06.00 वाजेच्या सुमारास कुंडाणे गावाच्या शिवारात शुगर अॅण्ड स्पाईस हॉटेलच्या अलीकडे मुख्यजलवाहिनीवर असलेला व्हॉल क्र 29याला कोणीतरी अज्ञात इसमाने फोडुन नुकसान केल्याने  त्याचे दुरुस्तीचे काम करुन पाणी गळती थांबवण्याचा प्रयत्न मनपाचे कर्मचारी करीत आहेत.

दिनांक 25.04.2025 रोजी दुपारी 04.30 ते आज दि 06.05.2025 रोजी सकाळी 06.00 वाजेपावेतो वेळोवेळी धुळे महानगरपालिकाने धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अक्कलपाडा धरणातून धुळे पर्यंत येणारी मुख्यजलवाहिनी वर बसविलेली व्हॉल क्र. 23,15, 25 व 29 यांना कोणीतरी अज्ञात इसमाने जाणीवपुर्वक लोकांना पाणी पुरवठा होवु नये म्हणून फोडले, नुकसान करुन त्याच्यातील लाखो लीटर पाण्याची गळती होवुन पाण्याची नासाडी झाली व त्यामुळे धुळे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी विलंब होत आहे. म्हणुन हे नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *