ए.आय. टेकनोलॉजीच्या सीसीटीव्ही सिस्टीममुळे यंदा
श्री एकविरादेवी यात्रेत गुन्हयामध्ये मोठ्या प्रमाणात घट
धुळे पोलीस दलाने केला आधुनिक यंत्रणेचा
सुयोग्य वापर – पोलीस निरीक्षक धनंजय पाटील
धुळे जिल्हा
धुळे शहरातील खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी यात्रा उत्सव नुकताच संपन्न झाला. या यात्रा उत्सवात पोलिसांनी प्रथमच अत्याधिक अश्या ए. आय. टेकनोलॉजीच्या सीसीटीव्ही सिस्टिमचा अतिशय प्रभावी वापर केल्याने यंदाच्या यात्रेत गुन्हयामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे.
धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी यासाठी आर्थिक मदत केली तर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले.
धुळे शहरात देवपुर पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक १३ एप्रिल २०२५ पासुन सुरु झालेला श्री एकविरादेवी यात्रोत्सव शांततेत पार पडला आहे. यात्रा कालावधीत एकही मंगळसुत्र चोरी, मोबाईल चोरी, भांडण इ. प्रकार देवपुर पोलीस ठाणे येथे रिपोटींग झालेला नाही फक्त यात्रा परीसर बाहेर अंधारातुन ४ मोटारसायकल चोरी झालेल्या आहेत. त्याचा देखील शोघ चालु आहे. यापुर्वी मागच्या वर्षी यात्रेत आलेल्या जवळपास १२ -१३ महिलांचे गळयातील माळा वैगरे गर्दीचा फायदा घेवुन संशयीत महिला चोर व विधीसंघर्षीत बालक यांनी चोरल्याचा तसेच जवळपास ८ मो सा.चोरी चे गुन्हे दाखल झाले होते. तसेच यापुर्वीच्या यात्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ चोरीच्या, पाकीटमारी, मोबाईल फोन चोरी, महिलांचें मंगळसुत्र व इतर दागीने चोरी, भांडण मारामा-या असे प्रकार घडायचे.
यावर्षी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे यांचे संकल्पनेतुन यात्रेत अत्याधुनिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही कॅमेरे (AI Technology cctv system) बसविण्यात आली, त्यासाठी धुळे शहराचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी संबधीत Aiwiz कंपनीला वैयक्तीकरित्या आर्थीक मदत केली, पाळणा चालविणारे व्यवसायीकांनी देखील सहकार्य करित cctv camera बसविले. त्या पैकी यात्रा गर्दी परीसरातील ८ आणि मंदीर परीसरातील ८ असे एकुण १६ कॅमेरे चे फुटेज देवपुर पोलीस ठाणे येथे तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रुम मध्ये विश्लेषण केले जायचे, त्यामुळे गर्दीचा अंदाज योग्य येत राहीला. त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त तिकडे पाठविला जायचा, तसेच महिलाचे गळयातील दागीने चोरणारे, गर्दीत दादागिरी करणारे, महिलांची छेड काढणारे, असे १७० इतक्या गुन्हेगाराचे फोटो आणि इतर माहिती सदर ए आय सीसीटीव्ही सिस्टीम मध्ये पुर्वीच भरण्यात आली होती, त्यामुळे संशयीत चोर किंवा गुन्हेगार या कॅमरेच्या समोर आल्यावर लगेच सिस्टिममध्ये अलर्ट येणार होता त्यापैकी ९ वेळा असा अलर्ट मिळाल्याने, वेळीच देवपूर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने हस्तक्षेप करुन खात्री केली म्हणून चोरी इ. गुन्हे घडले नाही तसेच योग्य पोलीस बंदोबस्त नेमला असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. असे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच इतर सर्व वरीष्ठ अधिकारी, शहर डिव्हिजन चे सर्व प्रभारी अधिकारी, एलसीबी, Dsb Pi, RPI ,PI Wireless सर्वानी मिळून योग्य बंदोबस्त पुरविला आणि मदत केली.
एकदंरीत कृत्रीम बुध्दीमत्ता (Artifical intelligence) हया अत्याधुनिक यंत्रणेचा श्रीकांत धिवरे पोलीस अधिक्षक, धुळे यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनातुन तसेच मा. आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या कडुन मिळालेल्या मदतीने सुयोग्य असा वापर झाला व त्यामुळे दरवर्षी होणा-या चो-या वैगरे, गुन्हयांना ९०% पेक्षा जास्त आळा घालण्यात यश मिळाले, तसेच गर्दीवर देखील वरील यंत्रनेच्या मदतीने लक्ष ठेवता आले. त्यामुळें यात्रा काळात कुठेही चेंगराचेंगरी, वैगरे झाली नाही, धुळे जिल्हा किंवा आसपास पहिल्यांदाच वरील प्रकारे मोठ्या प्रमणावर आधुनिक यंत्रणेचा सुयोग्य व फलदायी असा उपयोग झाला आहे.
ही ए आय यंत्रणा AIWIZ. Tech. Sol. हया धुळे येथील तरुण इंजिनिअर जयेश चौधरी व त्यांच्या सहाक-यांनी कार्यान्वित ठेवली, देवपुर पोलीस ठाणे संपुर्ण स्टाफ व धुळे पोलीस दल यांच्या सुरेख नियोजनाने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. असे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितले.