रोहिणीच्या जंगलात ७० लाखांचा गांजा पकडला
खड्ड्यात पुरलेला गांजा लागला पोलिसांच्या हाती
धुळे जिल्हा
धुळे जिल्हातील शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई करीत पोलिसांनी रोहिणी येथील जंगलात खड्डा खोदून त्यात लपवून ठेवलेला ७० लाख रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे.
रोहिणी (ता.शिरपूर) शिवारात रोहिणी शिवारातील जंगलात काहींनी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृष्य अंमली पदार्थ चोरटी विक्री करण्याच्या उद्देशान भला मोठा खड्डा खोदून बेकायदेशीरपणे साठवणूक ठेवल्याची खात्रीशीर माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना काल दुपारी मिळाली. त्यांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शना नुसार गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जंगलात छापा टाकत कारवाई केली.
तपासणीत खड्डयांमध्ये गांजाच्या प्रत्येकी २५ किलोच्या एकुण ४० व एक दहा किलोची एक गोणी अशा एकुण ४१ गोण्या मिळून आल्या. एकुण १ हजार १० किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला.
सात हजार रूपये किलो प्रमाणे या गांजाची एकुण किंमत ७० लाख ७० हजार रूपये इतकी आहे. याबाबत पोहेकॉं खसावद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाईदास जगतसिंग पावरा (वय ३१ रा. लाकड्या हनुमान ता. शिरपूर आणि बाबा अमरसिंग पावरा (वय ५० रा. रोहिणी) या दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पीएसआय मिलिंद पवार हे करीत आहेत.