छत्रपती संभाजी महाराज जयंतीला धुळ्यात होणार भव्य उत्सव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीला धुळ्यात भव्य उत्सव

 स्मारक समितीच्या संयुक्त बैठकीत झाला निर्णय

धुळे शहर

धुळे शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्याचा निर्णय छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. यानिमित्ताने भव्यदिव्य असा उत्सव साजरा केला जाईल.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निम्मित २७ एप्रिल रोजी सायंकाळी स्मारक समितीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक शंभू तीर्थ (नदी किनारी) येथे घेण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचे उत्तर महाराष्ट्रातले पहिले ३० फुटी स्मारक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीतर्फे उभारण्यात आले आहे.
हे स्मारक उभारल्यानंतर पहिल्यांदाच येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या अनुषंगाने शंभू प्रेमींचाही उत्साह वाढला आहे. या ऐतिहासिक स्मारकामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे यावेळी सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती धूमधडाक्यात साजरी करण्याची तयारी स्मारक समितीतर्फे सुरु झाली आहे.
शिव प्रेमी व शंभू प्रेमींची व्यापक बैठक घेऊन जयंती उत्सव समितीची कार्यकारणी तयार करण्यात येणार आहे अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम व सचिव अर्जुन पाटील यांनी दिली आहे.

या बैठकीला स्मारक समितीचे उपाध्यक्ष देवा सोनार, सहसचिव ऍड.प्रवीण शिसोदे,खजिनदार ऍड. नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रदीप जाधव, ऍड दिनेश काळे, ऍड.नामदेव मोरे, कोमल मराठे, खजिनदार ऍड.नितीन पाटील, ऋषिकेश पाटील, अभिनय पाटील व मनोज राजपूत यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *