अनधिकृतपणे वीज पुरवठा बंद करणाऱ्यावर धुळ्यात गुन्हा दाखल

धुळे शहर

महावितरण कंपनी च्या इलेक्ट्रिक लाइन चा मेन स्विच बंद करून विद्युत् कामात विना परवानगी हस्तक्षेप केला आणि लाइट बंद केली म्हणून धुळ्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार दि. 30 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता धुळे शहरातील काही ठिकाणी लाईट बंद करण्यात आली होती. यात संताजी जगनाडे महाराज चौक येथे विजेच्या डीपी वर सौउद अबिद सरदार,  रा. मच्छी बाजार या तरुणाने महावितरण कंपनी च्या इलेक्ट्रिक लाइन चा मेन स्विच बंद करून विद्युत् कामात विना परवानगी हस्तक्षेप केला आणि लाइट बंद केले.  लाईट बंद करण्याचा हा सर्व प्रकार घडला त्यावेळी काही नागरिकांनी त्या तरुणास हटकले.

याप्रकरणी महावितरण कंपनीच्या वतीने जितेंद्र अरुण पालवे यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्र-१०२/२०२५  भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १३८ नुसार <span;>सौउद अबिद सरदार,  रा. मच्छी बाजार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *