धुळयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
अभिवादन करीत मोटर सायकल रॅली
धुळे जिल्हा
११ व्या शतकातील महान समाजसुधारक, समतेचे पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज धुळे शहर आणि जिल्ह्यात वीरशैव लिंगायत समाजातर्फे साजरी करण्यात आली. यानिमित्त धुळे शहरातील बसवेश्वर चौकात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात देखील प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
धुळे शहरातून काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीत अविनाश खरवंडीकर सुभाष वाळेकर किशोर मोगलाईकर चंद्रशेखर बनछोडे, नितिन लिंगायत, महेंद्र लगडे, दिनेश लिंगायत, कपिल लिंगायत,रविंद्र गुळवे, विक्की कर्णे, सचिन कर्णे, नितिन गादगे, नरेंद्र गुळवे, शशी मोगलाईकर, ऍड. गजानन मेहकरकर, वाल्मीक लिंगायत, किशोर लिंगायत,राकेश लगडे, रामलिंगआप्पा लिभारे लिंगायत समाजाचे अध्यक्ष राकेश गादगे, युवा अध्यक्ष राजू गादगे, नितिन गुळवे, अक्षय बनछोडे, अशोक गुळवे, दीपक लोहारकर, नंदू वैद्य, महेश महिमाने, बाळू देवकर, युवराज वाळेकर, राधेश्याम गुळवे, पंकज गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते.