रावेर एमआयडीसी जागेसाठी पालकमंत्री जयकुमार रावल, आ.अनुप अग्रवाल यांचा पाठपुरावा यशस्वी

रावेर एमआयडीसीच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक

मुंबई

धुळे जिल्हातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात.पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून आता जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आणखी औद्योगिक विकास होणे आवश्यक आहे.नरडाणा (ता.शिंदखेडा) सोबतच  रावेर (ता.धुळे) येथे औद्योगिक विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.या अनुषंगाने रावेर येथे औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

रावेर एमआयडीसीच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात (मुंबई) बैठक झाली. या बैठकीसाठी पालकमंत्री जयकुमार रावल व धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते.ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

रावेर एमआयडीसी चा विस्तार करण्याचा विषय अनेक दिवसापासून प्रलंबित होता.गट नंबर 80 व गट नंबर 11 2017 एकर जागा रावेर एमआयडीसी करता उपलब्ध होणार असून यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे प्रयत्नशील होते आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रावेर एमआयडीसीला जागा देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला केलेत. पंधरा दिवसाच्या आत वन विभागातून सदरचे नोटिफिकेशन काढून सदर जागा महसूल विभागात हस्तांतरण करून ती जागा उद्योगांना उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक  चर्चा झाली.


जागा ही बऱ्याच कालावधीपासून एमआयडीसी कडे वर्ग करण्यासाठी प्रलंबित होती पण याचा पाठपुरावा कोणीही आजपर्यंत केलेला नाही याबाबत पालकमंत्री जयकुमार रावल व आ. अनुप भैय्या अग्रवाल साहेब यांनी सतत पाठपुरा करून या जागेचा प्रश्न तीन महिन्याच्या आत धडाडीने लावून धरला विविध ठिकाणी बैठका घेतल्या.

बैठकीच्या अनुषंगाने आज महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तथा माननीय जयकुमार जी रावल साहेब पालकमंत्री धुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत वन विभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते सदर बैठकीत असे ठरले की पंधरा दिवसाच्या आत सदर जागेचे नोटिफिकेशन काढून सदा जागा ही एमआयडीसी कडे हस्तांतरणाची कारवाई करण्यात यावी व वर्ग होताच उद्योगांना ही जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल या ठिकाणी मोठ मोठे उद्योग येतील व धुळ्याच्या प्रगतीमध्ये भर पडेल चे लोकेशन हे भौगोलिक रित्या उद्योगांसाठी चांगले आहे या ठिकाणाहून बरेच राष्ट्रीय महामार्ग जातात डोळ्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे तसेच रेल्वे मार्ग देखील उपलब्ध आहे धुळ्याला जोडणारा नवीन मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रगतीपथावर आहे या सर्व बाबींचा विचार होऊन या ठिकाणी उद्योगासाठी जागेची अडचण सोडवण्याचे धडाडी प्रयत्न माननीय आमदार अनुप भैय्यासाहेब अग्रवाल यांनी केल्याने सदर जागा धुण्यासाठी लवकरच उपलब्ध होईल याबाबतीचा  सकारात्मक घेण्यात आला.

*उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश–

महसूलमंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये धुळ्याचे जिल्हाधिकारी व एमआयडीसी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये फार्मिंग सोसायटींना देण्यात आलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर फार्मिंग  सोसायट्यांकडून गौण खनिजचे उत्खनन झाल्याने असे उत्खनन केलेल्या सोसायट्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांच्यावर   गौण खनिजांची दंडाची रक्कम वसूल करावी असे  निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

One thought on “रावेर एमआयडीसी जागेसाठी पालकमंत्री जयकुमार रावल, आ.अनुप अग्रवाल यांचा पाठपुरावा यशस्वी

  1. धुळे शहरा नजिक रावेर जवळील वनविभागाच्या व महसुल विभागाच्या जमीनीवर औद्योगिक विकास हौण्यासं हरकत नाही. पण या पैकी काही जमीनी फार्मिग सोसायट्यांना दिल्या होत्या. त्या जमीनी ज्यांनी पडीत ठेवल्यात त्या जप्त कराव्यात पण ज्या जमीनीवर काही लोक शेती करुन आपला उदर निर्वाह करीत आहेत अशा जमीनी शासनाला अधिग्रहण करता येणार नाहीत. शासनाने सर्व जमीनीचे मोजमाप करुन फार्मिंग सोसायच्यांच्या जमीनीवर खनिज उत्खनन केले त्या लोकांवर कठोर कारवाया कराव्यात. या बाबत मी वैयक्तिक पणे धुळे तहसिल कार्यालयात रावेर तलाठी कडे रितसर लेखी तक्रार करुन ही कार्यवाही झालेली नाही.
    या जमीनीमध्ये काही लोकांनी खरेदी विक्री करुन लाखो रुपये कमावले आहेत. यात प्रशासनातील भ्रष्ट लोक ही सामील आहेत. याची संपुर्ण चौकशी करुन दोषी लोकांवर गुन्हे दाखल करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *