सत्तार मेंटलचा साथीदार वसीम बाटला पोलिसांच्या हाती !

सिनेस्टाईल पाठलाग करीत केले जेरबंद..

धुळे शहर

धुळे जिल्हा पोलीस दलाने मोका कायद्यानुसार कारवाई करीत जेरबंद केलेल्या सत्तार मेंटल याच्या टोळीतील सदस्य आणि त्याचा प्रमुख साथीदार वसीम शेख उर्फ वसीम बाटला याला सीताफिने अटक केली आहे.

धुळे शहरातील शंभर फुटी रोडवरील डायमंड हॉलच्या पाठीमागे वसीम हुसेन शेख उर्फ वसीम बाटला (वय ४०, रा. जनता सोसायटी, वडजाई रोड, धुळे) लपून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस आल्याचे पाहताच वसीम बाटला पळून जात असताना पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याला जेरबंद केले.

वसीम बाटला हा कुखात गुंड सत्तार मेंटलचा साथीदार आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला वसीम बाटला याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे, मच्छिंद्र बोरसे, प्रल्हाद वाघ, सुशील शेंडे, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *