सोळावे पंथाचार्य पंथ श्री. हुजूर उदितमुनि नाम साहेब यांचे दर्शन व भेट बंदगीच्या सेवेचा लाभ
धुळे जिल्हा
धुळे शहरात कबीर पंथाच्या अनुयांच्या वतीने सद्गुरु कबीर धर्मदास वंशावली मिशनच्या संत कबीर नवोदय यात्रेचे आगमन झाले. यानिमित्त आज श्री हुजुर उदितमुनि नाम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरातून सकाळी नवोदय यात्रा काढण्यात आली. या यात्रेत कबीर पंथी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
दुपारच्या सत्रात शंभर फुटी रोडवरील सद्गुरु कबीर साहेब मंदिरात कार्यक्रम होतील अशी माहिती देण्यात आली. सलग दोन दिवस चालणार्या या कार्यक्रमात सर्व अनुयायांनी सहभागा व्हावे, असे आवाहन के.डी. व्ही. मिशन समिती, अमीन माता महिला मंडळ आणि सद्गुरु कबीर नवयुवक मंडळाने केले आहे.
धुळे शहरातील चाळीसगाव रोड शंभर फुटी रस्ता पोलीस स्टेशन समोरील सद्गुरू कबीर साहेब मंदिर येथे पंथ श्री हुजुर उदितमुनि नाम साहेब यांच्या आगमनानिमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज २२ एप्रिल रोजी सकाळी महात्मा गांधी पुतळ्या जवळून शोभायात्रा आणि कलशयात्रा निघाली. सद्गुरू कबीर साहेब मंदिर येथे या शोभा यात्रेचा समारोप झाला आणि प्रसादाचे वाटप झाले. यावेळी महंत शोभादास पवार, तुळसाबाई कोळवले, कमलबाई माईनकर, धिरज माईनकर, उषा लोकरे, शकुंतला खोपडे, अविनाश लोकरे यांच्यासह पदाधिकारी आणि सेवेकरी उपस्थित होते.
कबीर पंथाचे पंधरावे पंथाचार्य पंथ श्री हुजुर प्रकाशमुनी नाम साहेबांच्या कृपेने सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशन सद्गुरू कबीर साहेब नवोदय धुळे महाराष्ट्र नवोदित सोळावे पंथाचार्य पंथ श्री. हुजूर उदितमुनि नाम साहेब यांचे दर्शन व भेट बंदगीच्या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन के. डॉ. व्ही. मिशन समिती महाराष्ट्र राज्य व धुळे जिल्हा, अमीन माता महिला मंडळ तर्फे करण्यात आले आहे.